ज्या गुजरातमधील बलात्काराचा दाखला राज ठाकरेंनी दिला, त्याची रक्तरंजित आठवण आणि अल्पेश ठाकूर

Raj Thackeray on Gujrat Rape and Bihar violence : धक्कादायक प्रकारानंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर जीवघेणे हल्ले झाल्याच्याही घटना समोर आल्या होत्या.

ज्या गुजरातमधील बलात्काराचा दाखला राज ठाकरेंनी दिला, त्याची रक्तरंजित आठवण आणि अल्पेश ठाकूर
गुजरातच्या घटनेची आज काय राजकीय संदर्भ?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 12:59 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray Pune Sabha) अयोध्या दौऱ्याचा मुद्दा गाजला. मध्येच त्यांनी तो स्थगितही केला. पण दरम्यानच्या काळात उत्तर भारतीयांची माफी मागा, तरच अयोध्येत प्रवेश देऊ, अशी मागणी जोर धरत होती. भाजप खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांनी ही मागणी केली होती. मात्र राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेमध्ये राज ठाकरे यांनी माफीच्या मागणीवरुन पलटवार केला. गुजरातमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाचा दाखल यावेळी राज ठाकरेंनी दिला. हे प्रकरण नेमकं काय होतं, ते जाणून घेणार आहोत. गुजरातमध्ये (Gujrat 2018 Rape And Bihar violence) रातोरात बिहारच्या लोकांना हाकलवून लावलं होतं, असा दावा राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केलाय. त्यामुळे या प्रकरणावरुन पुन्हा चर्चांना उधाण आलंय. राज ठाकरेंच्या माफीची मागणी करणारे बृजभूषण सिंह आता अल्पेश ठाकूरांच्या माफीचीही मागणी करणार का, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जोतय. अल्पेश ठाकूर आणि गुजरातमधील हिंसाचाराचं ते प्रकरण 2018 साली चांगलंच चर्चेत आलं होतं.

काय आहे ती घटना?

तारीख होती 28 सप्टेंबर 2018. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना गुजरातमध्ये समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. गुजराच्या साबरकांठामध्ये 14 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला होता. बिहारच्या रविंद्र साहू या मजुराला अटक या अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी अटकही करण्यात आली होती.

पाहा राज ठाकरेंची संपूर्ण सभा

हे सुद्धा वाचा

परप्रांतीयांविरोधात रोष

या घटनेनंतर उत्तर भारतीयांविरोधात प्रचंड जनक्षोभ उसळला होता. या हल्ल्याचे लोण संपूर्ण गुजरातमध्ये पसरलं होतं. गुजरातमधील नागरिकांचा संताप पाहून अनेक उत्तर भारतीयांनी अखेर गुजरात सोडून मूळ गावी जाण्यासाठी धावपळ केली होती.

राजकीय अर्थ काय?

या धक्कादायक प्रकारानंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर जीवघेणे हल्ले झाल्याच्याही घटना समोर आल्या होत्या. 13 ऑक्टोबर 2018 रोजी समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, बिहारी तरुणाची लोखंडी रॉडने हत्याही करण्यात आली होती. गुजरातच्या केडिया गावात अमरजीत नावाचा मुलगा राहत होता. तो रात्री कामावरुन घरी परत येत असताना त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. हा हल्ला गुजरात हिंसेचा भाग असल्याचा आरोप अमरजीतच्या कुटुंबीयांनी केलेला होता.

पाहा व्हिडीओ :

उत्तर भारतीयांना पिटाळून लावण्यावरुन तेव्हा कुणाचा हात आहे, यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते. 2018 साली काँग्रेस आमदार असलेल्या अल्पेश ठाकूर यांच्यावर भाजपते तेव्हा गंभीर आरोप केले होते. अल्पेश ठाकूर यांनी ही हिंसा घडवून आणण्यात आली असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलेला. स्थलांतरीतांमुळे गुजरातमध्ये गुन्हेगारी वाझली आणि या लोकांमुळेच गुजराती लोकांना रोजगार मिळत नाही, असं म्हणत टीका करणारा अल्पेश ठाकूर यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता.

भाजपलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

दरम्यान, 2019 च्या विधानसभा पोटनिवडणुकीत अल्पेश ठाकूर यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली होती. त्यानंतर भाजपकडून त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती. या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता पुण्यातील राज ठाकरे यांनी याच प्रकरणावरुन भाजप खासदार बृजभूषण सिंहांना सवाल केलाय.

ज्या गुजरातमधील नेत्यानं काँग्रेसमध्ये असताना बिहारींबाबत मोठा राडा केला, तोच नेता भाजपात आल्यानंतर भाजप खासदार माफी मागणार का? असा थेट सवालच आपल्या भाषणातून राज ठाकरेंनी बृजभूषण सिंह यांना विचारलाय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.