Raj Thackeray : बाळासाहेबांचं ऐकणार आहात की, शरद पवारांचं? राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भोंग्यावर थेट सवाल
राज ठाकरे यांनी आज एक पत्रक काढून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलंय. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मशिदींवरील भूमिकेची आठवण करुन दिली आहे. तसंच राज यांनी पत्रकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केलीय.
मुंबई : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवर ते आजही ठाम आहे. राज यांनी आज एक पत्रक काढून आपली पुढील दिशा स्पष्ट केलीय. रमजान ईदच्या (Ramadan Eid) एक दिवस आधी राज ठाकरे यांनी एक आवाहन करत मी ट्वीटद्वारे पुढील भूमिका स्पष्ट करेल असं सांगितलं होतं. त्यानुसार राज ठाकरे यांनी आज एक पत्रक काढून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आवाहन केलंय. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मशिदींवरील भूमिकेची आठवण करुन दिली आहे. तसंच राज यांनी पत्रकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केलीय.
बाळासाहेबांचं ऐकणार शरद पवारांचं?
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदूहदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंग बंद झालेच पाहिजेत” हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे, असं आव्हान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. तसंच देशात इतकी कारागृह नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल! हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे. माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारुन एकत्र या. आता नाही, तर कधीच नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
सर्वांना आवाहन pic.twitter.com/SNgxd2GMTA
— Raj Thackeray (@RajThackeray) May 3, 2022
राज ठाकरे यांच्या मनसैनिकांना कोणत्या सूचना?
हिंदूंच्या सणांना सायलन्स झोन, शाळा, रुग्णालय अशा सर्व प्रकारच्या अटीशर्तीच्या नावाखाली मर्यादा घालायच्या, परंतु मशिदींना कोणत्याही प्रकारच्या अटी घालायच्या नाहीत! भारतीय संविधानाने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येत हे बसते? म्हणूनच हिंदूंनो,
1. त्यांना आपली हनुमान चालिसा ऐकवा
2. सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत.
3. मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या झाल्या पोलिसांसाठीच्या १०० या क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांचा त्रासाबाबत तक्रार करावी. रोज करावी.
“…Are you going to listen to this? Or are you going to follow what non-religious Sharad Pawar who is responsible to keep you in power?”: MNS Chief Raj Thackeray
— ANI (@ANI) May 3, 2022
राज ठाकरेंचं पोलीस आणि कार्यकर्त्यांना आवाहन
कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की, या देशात, या राज्यात ‘कायद्याचं राज्य आहे हे त्यांनी दाखवून द्यावं. त्यांनी अनधिकृत मशिदी, अनधिकृत भोंगे, रस्त्यांवर होणारे नमाज पठण यांना जबाबदार असलेल्या लोकांना आपला पोलिसी खाक्या दाखवावा.
सामाजिक भान बाळगत ज्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्या मशिदींशी संबंधित लोकांच्या स्तुत्य निर्णयाचे मी स्वागत करतो. तसंच, जिथे भोंगे उतरवण्यात आले आहेत, त्या मशिदींच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही, याची हिंदू बांधवांनीही काळजी घ्यावी.