Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गचांडी पकडणार? अच्छा?… मनोज जरांगे पाटील यांच्या ‘त्या’ विधानावर राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा हा दौरा संपतोय. काल त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. पण आज राज ठाकरे यांचं संभाजीनगरमध्ये आगमन होताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या वाहनांवर जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

गचांडी पकडणार? अच्छा?... मनोज जरांगे पाटील यांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरे काय म्हणाले?
raj thackeray Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 2:56 PM

माझं मराठा बांधवांना आवाहन आहे. कोणत्याही नेत्याला अडवू नका. आपलं आंदोलन सुरू नाही. मराठ्यांची ताकद कमी झाली असं म्हणत होता ना? त्यांना जर जाब विचारायचा असेल तर मुंबईत जाऊन त्यांची गचांडी धरून जाब विचारू. एवढी आपली ताकद आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी बोलताना म्हटलं होतं. त्यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अच्छा… गचांडी? बरं, ते भेटल्यावर मी त्यांना विचारेन, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

राज ठाकरे यांचा मराठवाड्याचा दौरा आज संपत आहे. संभाजीनगरमध्ये आल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील वातावरण आणि राजकीय नेत्यांच्या भूमिका यावर भाष्य केलं. तसेच काही लोकांना राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत. त्यामुळेच समाजात विष कालवलं जात असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.

ती शरद पवार आणि ठाकरेंची माणसं

मनोज जरांगे तुम्हाला गचांडी पकडून जाब विचारणार आहेत. तसं विधान त्यांनी केलं, असं राज ठाकरे यांना विचारण्यात आलं. त्यावर राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गचांडी? अच्छा? हे त्यांचे शब्द आहेत की तुम्ही कोणी भरले? भेटल्यावर मी त्यांना बोलेल. मुळात पहिली गोष्ट लक्षात घ्या. काल जी बीडमध्ये विरोध करणारी माणसं होती. ती जरांगेंची नव्हती. ती कोण माणसे होती हे तुम्ही पाहिलं ना? झालं? संपला विषय. त्यांची माणसं नव्हती. ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची माणसं होती. त्यावर मी बोललो आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

जरांगेंच्या आडून राजकारण

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आरक्षणाचं काही पडलेलं नाही. त्यांना मनोज जरांगे यांच्या माध्यमातून राजकारण करायचं आहे. 82-83 वर्षाचे शरद पवार महाराष्ट्राचा मणिपूर होईल, अशी स्टेटमेंट करतात. या लोकांनी महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये याचीचिंता वाहिली पाहिजे, पण ते महाराष्ट्राचा मणिपूर होईल असं म्हणत आहेत. यावरून यांच्या डोक्यात काय चालू आहे हे लक्षात घ्या, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर…

शरद पवार यांचं राजकारण तुम्ही पाहा. जेम्स लेनप्रकरणापासून त्यांनी स्टेप बाय स्टेप जातीय तेढ निर्माण करणारं राजकारण केलं. सर्वांनाच जातीबद्दल प्रेम असतं. वर्षानुवर्षापासून आहे. पण फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील प्रत्येक व्यक्तीचं जातीबद्दल प्रेम आहे. पण दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष पसरवण्याचं काम राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सुरू झालं, असा आरोप त्यांनी केला.

मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.