मुंबई : “कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या कडक निर्बंध लादले गेले आहेत. या संदर्भाने मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटीची वेळ मागितली होती. तशी विनंती केली होती. पण मुख्यमंत्री क्वारन्टाईन असल्याने ही भेट होऊ शकली नाही. काल आम्ही झूम मिटिंगद्वारे चर्चा केली”, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिली. (Raj Thackeray said, Lets meet, CM Uddhav Thackeray said, I am a quarantine!)
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद (Raj Thackeray Press Conference) घेत मुख्यमंत्री आणि त्यांच्यातल्या बैठकीचा तपशील सांगितला. बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेत असल्याचं राज यांनी सांगितलं.
राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मी फोन केला होता. महाराष्ट्रात सुरु असलेल्या लॉकडाऊनबाबत तसंच घातलेल्या निर्बंधाविषयी बोलण्याकरिता भेटीची विनंती केली होती. मात्र त्यांचा मला फोन आला. त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक कोरोनाग्रस्त असल्याने ते क्वारंन्टाईन असल्याचं त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे प्रत्यक्ष भेट न होता ही बैठक झूम अॅपवर झाली. त्यांना दिलेल्या सूचना सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केल्याचं त्यांनी सांगितलं.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. ‘मी किंबहुना वापरलं तर चालेल ना?’, अशी मजेशीर कोटी त्यांनी केली. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात ‘किंबुहना’ शब्दाचा बऱ्याचदा वापर करताना दिसतात. यावरुनच राज ठाकरे यांनी मिश्किल टिप्पणी केली.
जे छोटे उद्योग आहेत, त्यांना उत्पादन करायला सांगितलंय पण विक्रीला बंदी आहे, असं असेल तर उत्पादन करुन ठेवायचं कुठे, विकायचं नाही तर उत्पादन का करायचं… म्हणून मी सांगितलं दोन तीन दिवस विक्रीसाठी सुरु ठेवा. छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून २-३ दिवस दुकानं सुरु करण्यास परवानगी द्या…
बँकांची जबरदस्ती थांबवावी
अनेकांनी छोटी मोठी कर्ज घेतली आहेत. बँकांकडे पैसा गेला पाहिजे मान्य, पण लोकांकडे पैसा असेल तर बँकात जाईल. सक्तीने वसूल केलं जात आहे. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, मग लोकांनी हप्ते कसे भरावे?
वीज बिल आणि व्यवसाय कर
सरसकट लॉकडाऊन काळात वीजबिल माफ करणे आणि जीएसटीबाबत व्यापाऱ्यांना सूट द्यावी, राज्याने केंद्राशी बोलावं, अशी सूचना केल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.
कंत्राटी कामगार
लॉकडाऊनमध्ये सरकारी कंत्राटी कामगारांना घेतलं होतं, पण नंतर काढून टाकलं.. मी सूचना केली, त्यांना घ्या, तहान लागली की विहीर खोदणं योग्य नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना परत सेवेत घेऊन त्यांची कायमस्वरुपी व्यवस्था करावी, अशी सूचना दिली. या सूचना योग्य आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळाशी बोलण्याचं आश्वासन दिलं.
जीम सलून यांना परवानगी द्या
जीम, सलून यांनाही दोन-तीन दिवस सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी. स्वीमिंग पूल बंद ठिक आहे. पण खेळाडूंना सवलत हवी. स्वीमिंग पूल असो वा अन्य खेळ, बॉडी बिल्डरना सराव करण्यासाठी जीम सुरु ठेवावी.
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. एकतर बाहेरच्या राज्यांमधून महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणावर लोक येत आहेत. दुसऱ्या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे देशात फक्त महाराष्ट्रातच कोरोना रुग्णांची संख्या जास्त दिसत आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
(Raj Thackeray said, Lets meet, CM Uddhav Thackeray said, I am a quarantine!)
हे ही वाचा :
‘किंबहुना’ वापरलं तर चालेल ना; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या शैलीवर मिश्किल टिप्पणी
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या सर्वात महत्त्वाच्या सूचना नेमक्या काय?