Raj Thackeray : राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, भोंग्यांबाबत ट्विटरवर भूमिका जाहीर करणार

परवा औरंगाबादच्या जाहीर सभेत देखील त्यांनी मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचं जाहीर केलं.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, भोंग्यांबाबत ट्विटरवर भूमिका जाहीर करणार
राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवलीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 8:08 AM

मुंबई – राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) घराबाहेर सुरक्षा वाढवली. गुढी पाडव्याच्या जाहीर सभेत त्यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा नाहीतर त्यापुढे हनुमान चाळीसा (Hanuman Chalisa) लावा अशी भूमिका घेतली. तेव्हापासून राज्यातलं राजकारण अधिक तापलं आहे. परवा औरंगाबादच्या (Aurangabad) जाहीर सभेत देखील त्यांनी मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचं जाहीर केलं. तसेच या पुढची भूमिका मी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करणार असल्याचं सु्ध्दा त्यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत त्यांनी राज्य सरकारला 3 तारखेचा अल्टीमेटम दिला होता. आज सकाळी नऊ वाजता राज ठाकरे काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत राहत्या घरी बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते त्यांची भूमिका जाहीर करतील. विशेष म्हणजे इतरवेळी त्यांच्या घराबाहेर ठराविक पोलिस असतात. परंतु सध्या त्यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

ईदचा सण साजरा केला जात आहे

देशभरात आज ईदचा सण साजरा केला जात आहे. राज्यात सुरू असलेल्या लाऊडस्पीकरच्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मुस्लिम समाजातील लोक सकाळपासूनच मशिदींमध्ये आणि रस्त्यावर नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने पोहोचत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुंबईच्या दोन प्रसिद्ध मशिदी आहेत. रस्त्याच्या एका बाजूला हमीदिया मशीद तर दुसऱ्या बाजूला मिनारा मशीद आहे. दोन्ही मशिदींमध्ये नमाज अदा करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले होते.

रमजान इदच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त

रमजान इदच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचा शहरातील विविध भागात मोठा फौजफाटा आहे. त्याशिवाय एसआरपीएफ तुकड्या, डॉगस्कॉड, बॉम्ब शोधक नाशक पथकांकडूनही ठिकठिकाणी तपासणी करण्यात येणार येत आहे. सामाजिक सलोखा राखण्याचे पुणे पोलिसांनी आवाहन केले. आज दिवसभरात पोलिसांचा कडक पोलिस बंदोबस्त राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.