राज ठाकरे प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात : अबू आझमी
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेला आले. नको त्या विषयावर राजकारण झालं आणि वाद-विवाद देखील झाले. मात्र आता प्रचारतोफा थंडावल्या आहेत आणि शेवटच्या टप्पाच्या मतदानानंतर सर्वांचं लक्ष असणार आहे निकालाकडे. महाराष्ट्रात युती, आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि सपा-बसपानेही निवडणूक लढवली. सपाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेला आले. नको त्या विषयावर राजकारण झालं आणि वाद-विवाद देखील झाले. मात्र आता प्रचारतोफा थंडावल्या आहेत आणि शेवटच्या टप्पाच्या मतदानानंतर सर्वांचं लक्ष असणार आहे निकालाकडे. महाराष्ट्रात युती, आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि सपा-बसपानेही निवडणूक लढवली. सपाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. शिवाय त्यांनी भाजपवरही निशाणा साधलाय. राज ठाकरेंचा पक्ष संपला असून ते प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात, असा आरोप अबू आझमींनी केला.
राज यांच्या सभांचा महाराष्ट्रात भाजपविरोधी वातावरण तयार करण्यात फायदा होईल, असं अबू आझमी म्हणाले. राज ठाकरेंमुळे परप्रांतियांना मारहाण झाली होती हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी विसरले आहेत. राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे काँग्रेस आणि महागठबंधनला राज्याच्या बाहेर नुकसान होईल, असा दावाही त्यांनी केला. राज ठाकरे हे मिमिक्री आर्टिस्ट आहेत. मेहमूद आणि असरानी यांच्यासारख्या कलाकारांना लोक ऐकायचे तसं राज ठाकरेंना लोक ऐकतात. राज ठाकरे सर्व प्रकरणात सेटलमेंट करतात, त्यांचा पक्ष संपलाय, असा घणाघात अबू आझमींनी केला.
अबू आझमी यांनी भाजपवरही सडकून टीका केली. देशात 100 टक्के भाजपच्या विरोधात वातावरण असल्याचं ते म्हणाले. भाजपच्या पापांचा घडा भरलेला आहे. निवडणूक आयोगानेही भाजपात प्रवेश केलाय आणि कार्यकर्त्यांसारखं काम केलं जातंय. उत्तर प्रदेशात भाजपला 50 टक्के नुकसान होईल, असा आरोप त्यांनी केला.
भाजपकडून दबावतंत्र वापरलं जात असल्याचा आरोप अबू आझमींनी केला. शिवाय देशातील मुसलमानांना विनाकारण जेलमध्ये टाकलं जातं आणि पुरावेही मागितले जात नाहीत. पण साध्वी प्रज्ञासिंगच्या अटकेनंतर पुरावे मागितले जातात, असं म्हणत अबू आझमींनी साध्वीच्या वक्तव्यावरही जोरदार टीका केली.
VIDEO :