मास्क न लावल्याने संजय राऊतांना दंड, मास्क न लावण्याचं कारण राज ठाकरेंनी सांगावं, राऊतांचं आवाहन

मुंबई : मास्क हीच खरी लस आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान वारंवार हेच सांगत आहे. राज ठाकरेंनी मास्क का वापरायचा नाही, याचं एकदा ठोस कारण सांगावं, असं आवाहन शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांना केलंय. (Raj Thackeray should explain the reason for not wearing mask Says […]

मास्क न लावल्याने संजय राऊतांना दंड, मास्क न लावण्याचं कारण राज ठाकरेंनी सांगावं, राऊतांचं आवाहन
संजय राऊत आणि राज ठाकरे
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 3:48 PM

मुंबई : मास्क हीच खरी लस आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान वारंवार हेच सांगत आहे. राज ठाकरेंनी मास्क का वापरायचा नाही, याचं एकदा ठोस कारण सांगावं, असं आवाहन शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांना केलंय. (Raj Thackeray should explain the reason for not wearing mask Says Sanjay Raut)

राज ठाकरे विनामास्क प्रवास करतात, हे अनेकदा समोर आलंय. आजही त्यांनी नाशिक दौऱ्यात मास्क परिधान केलेलं नव्हतं. तसंच नाशिकचे माजी महापौर मुर्तडक यांनाही राज ठाकरे यांनी चेहऱ्यावरील मास्क काढण्याची सूचना केली. त्यामुळे राज ठाकरेंचा ‘विना मास्क इशारा’ चर्चिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या मास्क न घालण्याच्या वर्तनावर टोलेबाजी केली.

सर सलामत तो पगडी पचास

देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री कोरोना काळात मार्गदर्शन करत आहेत. त्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. सर सलामत तो पगडी पचास तसं आधी जीव महत्वाचा आहे. इस्पितळात गेल्यावर जे भोगावे लागते ना…तेव्हा वाटते अरेरे ऐकायला हवे होते…मास्क घालायला हवे होते. मग आधीच ऐका ना, असा सल्ला राऊत यांनी राज ठाकरे यांना दिला.

राज ठाकरेंनी स्पष्टीकरण द्यावं, मास्क का वापरायचा नाही?

राज ठाकरेंबद्दल काय बोलणार… ते मनसेचे पक्षाचे नेते आहेत पण मास्क का वापरत नाहीत याचं त्यांनी ठोस विश्लेषण करणे गरजेचे आहे. वैद्यकीय कारण काय आहे?, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. ते सुद्धा कलाकार आहेत, जाणकार आहेत. लोकांचे नेते आहेत. त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे, मास्क का वापरू नये? मुख्यमंत्री, पंतप्रधान म्हणतात मास्क वापरा… तसं राज ठाकरेंनी पटवून दिले पाहिजे मास्क का वापरू नये. पण शेवटी मास्क न वापरणे लोकांसाठी धोका आहे. काल अजित पवार यांनीही सांगितले. ते स्वतः या संकटातून गेले आहेत. मास्क वापरणे किती गरजेचे आहे हे ज्यांना करोना झाला आहे किंवा होऊन गेला आहे त्यांना ठाऊक आहे.

मास्क हीच खरी लस

मुख्यमंत्र्याचा आरोग्य या विषयावर चांगला अभ्यास आहे. या विषयांवर त्यांना बरचंस कळतं. जागतिक आरोग्य संघटनेने काही मापदंड घालून दिले आहेत. देशाचे पंतप्रधान, विविध मंत्री, मुख्यमंत्री कोरोना काळात मार्गदर्शन करत आहे. मास्क हीच खरी लस आहे आणि त्यात तथ्य देखील आहे, असंही राऊत म्हणाले.

जेव्हा माझा मास्क खाली येतो, तेव्हा मला मुख्यमंत्र्यांची आठवण येते

कधी कधी आमच्याडूनही ढिलाई होते, पण तसं चालत नाही. रस्त्यावर फिरताना, सार्वजनिक ठिकाणी, नियमांचे पालन करायला हवे. मी बहुतांश वेळा नियमांचं पालन करतो. पण जेव्हा मास्क खाली येतो तेव्हा मला मुख्यमंत्र्यांची आठवण येते. कारण त्यांनी असं पाहिलं तर ते ताबडतोब चंपी करतात. प्रेमाने म्हणा किंवा काळजीपोटी.. पण मास्क घालण्याचा ते नेहमी आग्रह धरतात, असं राऊत म्हणाले.

जेव्हा संजय राऊतांना दंड होतो…

मास्क घातला नाही तर बऱ्याच ठिकाणी कारवाई होते. दिल्लीत मी स्वतः कारवाईला समोरा गेलो आहे. दंड भरला आहे. माझ्यासह अनेक खासदारांनीही दंड भरला आहे. एकदा गाडीतून विमानतळावर जात असताना फोनवर बोलण्यासाठी मास्क थोडा खाली केला होता. पण पोलीस पथकाने ते बरोबर हेरलं. माझी गाडी बाजूला घेतली. माझे PA त्यांना म्हणाले, MP साहेब आहेत. त्यावर पोलिसांचे उत्तर बाणेदार होते, ते मला खूप आवडले. MPअसले म्हणून काय झाले ? मास्क वापरणे आवश्यक आहे आणि MP साहेब कायदा तयार करणारी मंडळी आहेत. आम्ही कायद्यानुसार कारवाई करतो. मी ताबडतोब दंड भरला कारण मी नियम मोडला होता, असंही संजय राऊत यांनी सांगितलं

संजय राऊत यांनी दंड भरलेली पावती

संजय राऊत यांनी दंड भरलेली पावती

आम्ही लॉ मेकर, नियम पाळले पाहिजे

आम्ही लॉ मेकर आहोत. पोलिसांचे म्हणणे मला पटले. मी दोन हजार रुपये दंड भरला. त्याची रीतसर पावती मला दिली. चूक केली तर मी कारवाईला सामोरे जायला हवे. माझ्यामुळे इतरांना त्रास व्हायला नको, असंही राऊत म्हणाले.

(Raj Thackeray should explain the reason for not wearing mask Says Sanjay Raut)

हे ही वाचा :

VIDEO | राज ठाकरे विनामास्क नाशकात, मास्क काढ, माजी महापौरांना सूचना

बंगालमध्ये M फॅक्टरचीच लढाई; भाजपच्या ‘जय श्रीराम’च्या नाऱ्याविरोधात दीदीचे स्पेशल ’42 M’ वाचा स्पेशल रिपोर्ट

‘अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण’ ते ‘शिवसेनेची रणरागिणी’, कोण आहेत नीलम गोऱ्हे?; वाचा सविस्तर

OBC पदोन्नतीबाबत सरकारचं धोरण चुकीचं, निर्णय मागे घ्या नाहीतर मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही : पडळकर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.