Raj Thackeray | बॅलेट पेपरवर निवडणुकीत भाजप जिंकलं, तर मी स्वतः जाऊन पुष्पगुच्छ देईन : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करताना, ईव्हीएमवरुन सरकारवर हल्ला चढवला. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाषणाच्या सुरुवातीला पूर परिस्थितीवरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.

Raj Thackeray | बॅलेट पेपरवर निवडणुकीत भाजप जिंकलं, तर मी स्वतः जाऊन पुष्पगुच्छ देईन : राज ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 09, 2019 | 1:25 PM

Raj Thackeray मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करताना, ईव्हीएमवरुन सरकारवर हल्ला चढवला. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाषणाच्या सुरुवातीला पूर परिस्थितीवरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. ईव्हीविरोधात येत्या 21 ऑगस्टला जो मोर्चा आयोजित केला होता, तो पूरस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.

देशातील निवडणुका फक्त मतपत्रिकेवर व्हाव्यात ह्यासाठीचा मोर्चा २१ तारखेला होणार होता पण तो सध्याची पूरपरिस्थिती लक्षात घेऊन पुढे ढकलला आहे. त्याची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

वेधशाळेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

5 ऑगस्टला मेळावा आयोजित केला होता, पण पावसामुळे रद्द करावा लागला. वेधशाळेने अंदाज दिला होता पाऊस पडेल, पण हे लोक कोण आहेत ठाऊक नाही, वेधशाळेच्या लोकांवर गुन्हा दाखल करायला हवा, असं राज ठाकरे म्हणाले.

आजची तारीख जाहीर केली, पण कोल्हापूर आणि परिसरात पूरस्थिती आहे. आजचा मेळावा राजकीय असला तरी राजकारण करण्याचा नाही, असं राज यांनी सांगितलं.

गिरीश महाजनांचा सेल्फी

कोल्हापूर-सांगली परिसरात मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पाहणी करत आहेत, खाली गिरीश महाजन सेल्फी काढत आहेत. यांना कसलाही फरक पडत नाही कारण यांना ठाऊक आहे मतदान यांनाच होणार आहे, असं राज म्हणाले.

आकड्यांचं राजकारण

आम्ही जो आकडा सांगितलाय तो येणार, हे ठाऊक आहे. भाजपची एक वरिष्ठ व्यक्ती म्हणाली, उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, मनसे, राजू शेट्टी आणि इतर एकत्र आले तरी आम्ही जिंकणार. कारण का, तर त्यांच्याकडे मशीन नाही आहेत, कोण बोललं ते ठाऊक आहे, असं राज ठाकरेंनी नमूद केलं.

लोकसभेचे निकाल 23 मे रोजी लागले. त्यानंतर आजपर्यंत आपल्याशी बोलणं झालं नाही. त्यादिवशी एकच प्रक्रिया दिली होती. अनाकलनीय. हे कसं झालं ठाऊक नाही, म्हणून ही प्रतिक्रिया दिली

या सगळ्या माहोलमध्ये काय घडलं हे सगळं विसरलं जातं. कोणतीही गोष्ट व्हॉट्सअप सारखी आहे. एवढ्या गोष्टी पडतात, (मेसेज) मग मागचं विसरलं जातं. जे सगळ्यांनी दाखवलं ते डिलीट केलं, मी सेव्ह केलं, मागे दाखवलेले व्हिडीओ.

काही गोष्टी लिहून आणल्या

आज बोलायचंय तुमच्याशी म्हणून काही गोष्टी लिहून आणल्या आहेत. मध्यंतरी सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांची ईव्हीएमबाबत भेट घेतली. भाजपचं असं चालू राहिलं तर निवडणुका लढवायला नको मग असं त्यांना सांगितलं. त्याही सहमत झाल्या. सगळ्यांनी सांगितलं आंदोलनात आम्ही सहभागी आहोत.

हे माझं आंदोलन नाही, हार-जीत मान्य करावी पण जर कोण फसवत असेल तर काय करायचं? पैसे खर्च करुन सगळं करणार आणि रिझल्ट ठरला असेल तर सगळं करायचं कशासाठी? हे देशभर चाललंय.

कलम 370 कश्मीरमधून रद्द झाल्यानंतर सगळ्यांनी पेढे वाटले, पण 371 मतदारसंघात जो घोळ झाला त्यावर कोणी बोलायला तयार नाही.

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

  • आज आपण सर्वसाधारण काय झालंय त्यावर बोलू
  • Tv वर कसं दाखवतात तसं आधी ठळक बातम्या वाचू
  • तर त्या अश्या , आरटीआयमध्ये फेरबदल झाले, म्हणजे हा अधिकार केंद्रानं स्वतःकडे घेऊन सगळी माणसं केंद्र ठरवणार, केंद्राचा अर्थ काय तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा, करण सगळं ते ठरवणार
  • अधिकाऱ्याला तिथे राहायचं असेल तर सरकार समोर मिंदे व्हावं, म्हणजे यापुढे माहिती मिळणार नाही
  • पुढचा कायदा केला दहशतवादी विरोधी कायदा, यात काय तर एका माणसावर संशय आला तरी तो दहशतवादी, पण त्याची संज्ञा काय, तर नाही . म्हणजे उद्या आंदोलन केल्यास तुम्ही दहशतवादी. म्हणजे कोणाला जेल मध्ये टाकायचं हे ठरवणार शहा
  • देशाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलीये, जेट एअरवेज बंद झालं सरकारने मदत नाही केली बरेच लोक बेरोजगार झाले.
  • बरेच व्यवसाय बंद व्हायला आले.
  • Bsnl 54 हजार लोक बेरोजगार
  • हिंदुस्थान आरोनॉटिक्स बंद झालं
  • ही परिस्थिती अशीच राहिली तर 10 लाख लोक बेरोजगार होतील
  • टाटांनी टाटा मोटर्स 5 दिवस बंद ठेवली
  • स्टेट बँक तोट्यात , RBI कडून सरकर पैसे काढत असेल आणि बँका डबघाईला आल्या तर त्या बँकांना कोण पैसे देणार, तुमचे पैसे मग गेले
  • महाराष्ट्रात दीड लाख  तर देशात 6 लाख कंपन्या बंद झाल्या
  • एक माणसाला वाटलं नोट बंद कराव्या, पण या नोटबंदीचा परिणाम काय होईल हे मी सांगितलं होतं. त्यावेळी रांगेत उभे राहून लोक मेले
  • GST वर  पैसे केंद्राकडून येत नसतील तर राज्य महापालिका कशा चालणार? आणि आम्ही 370 रद्द झालोय तेच घेतोय
  • हे कलम घेऊन आपण बसलोय पण 371 ठिकाणी फ्रॉड होतं.
  • मोदी म्हणतायत काश्मीरमध्ये रोजगार निर्माण करु, पण इतर राज्यात का नाही रोजगार निर्माण केला जात?
  • तुमचं दुर्लक्ष केलं जातंय, नमोनमोचा जप करणाऱ्याच्या घरावर टकटक होईल तेव्हा कळेल, यांचे अनेक समर्थक यांना आता शिव्या घालतायत. पण यांना तुमची फिकर नाही
  • घडलेलं ठिकठाक करायला त्यांनाच ठाऊक नाही काय करायचं. उद्या समान नागरी , मग राम मंदिर काढतील आणि आम्ही पेढे वाटू पण हातात काहीच लागणार नाही.
  • स्वातंत्र्यानंतर प्रांत रचना करावी लागली, पण ती मेल्यानंतर सगळं हे खोदून मोडतायत.
  • अस्मिता काय असते  ते पश्चिम बंगालला विचारा. त्यांच्या मंत्रालयात गेलो होतो त्या तिथे लिफ्टमध्ये आपल्यासारखं दरवाजा बंद करा नव्हे तर तिथे किशोर कुमारची बंगाली गाणी लागली होती. आमच्या मंत्रालयात मराठी गाणी लागतीलकाय ? याला म्हणतात अभिमान.
  • सगळ्या अस्मिता घट्ट असतात. पण हिंदी आणि इंग्लिश मीडिया ने किती आरोप केले केसेस पडल्या आपल्यावर. रेल्वेचं आंदोलन केलं.
  • गुजरातमध्ये आंदोलन झालं तेव्हा ते लोक बाहेर काढले ते गावी न जात इथे आले
  • हे ज्यांनी केलं कल्पेश ठाकूर त्यांचा भाजपात प्रवेश झाला
  • त्याला भाजपमध्ये प्रवेश मिळतो आणि आमच्यावर केसेस पडतात.
  • आज काश्मीरमध्ये सैनिक घुसलं, इंटरनेट, टेलिव्हिजन बंद केलं. उद्या विदर्भ मुंबई असेल.
  • महाराष्ट्रातही सगळ्या गोष्टी बंद करून तुमचा विचार न करता लचके तोडतील. ही हिंमत आली बहुमताने
  • त्यांचे आमदार इतर लोक कोणाही बाईवर हात टाकतायत, रेप होतायत, पण बातम्या एक दिवस दाखवणार, Ed ची नोटीस मला हॅलो बोलायला आली नाही.
  • पत्रकारांना सरकार विरोधात लिहायचं आहे, पण लिहू दिलं जात नाही.  सरकारच्या फेवर मधल्या बातम्या 2 ते 5 दिवस चालतील.
  • न्यायालयातून न्याय मिळेल हे शक्य नाही.
  • आपण कशात जखडले जातोय याचा अंदाज नाही
  • मी म्हटलं होतं उद्या तुम्ही सगळं बघाल पण लिहू शकत नाही.
  • काही मीडिया दाखवते पण त्यांच्यावर नंतर दबाव येतो
  • या सगळ्या गोष्टी कशामुळे सुरू आहेत,  यासाठी हे आंदोलन सुरू आहे
  • सगळ्या गोष्टींचा विचार करून मी या निर्णण्यावर आलो
  • मागील दोन तीन महिन्यात सांगण्यास सुरुवात झालीय cm बोलले 250 जागा येतील , मग आम्ही काय करायचं …. करायचं काय?
  • आकडा सांगून मग तुम्हाला पटवून देण्यासाठी पुलवामा, आणि सारख्या गोष्टी सांगायच्या
  • लोक हल्ली घरातल्या घरात संशयाने बघायला लागलेत. रात्री माझ्यासोबत बसला होता, आणि आज…… घरात मतं 15 आणि पडले2
  • जे आटोक्यात येत नाहीत त्यांना चोपड्या आणि नाहीतर घरी.
  • चोपड्या काढून गप्प केलं जातं.
  • फडणवीसांनी यात्रा केली आणि परिवर्तन झालं , असं म्हटलं जाईल. काश्मीरचा परिणाम लोकांनी भाजपला मतदान केलं असं सांगितलं जाईल.
  • राज्यसभेत कुठे जागा कमी आहेत त्या आता भरा, मग तुम्हाला कोण विचारतोय
  • भाजपचे जे फॉलोवर असतील समाज माध्यमनावर त्यांना या लोकांचा वरवंटा फिरेल तेव्हा तुम्ही, तुमची जात नाही पाहणार तर मराठी म्हणून फिरेल
  • तेव्हा तुम्ही सांगू शकणार नाही मी तुमचाच प्रचार केला,कारण वरवंटा सरसकट फिरेल.
  • अजून नाही कळणार, कारण दरववजवर टकटक नाही झालीय
  • निवडणूक आयुक्तांना भेटून मशीन कुठे बनतात? आणि जीव म्हणजे चिप कुठे बनतात, तर ते म्हणाले अमेरिका आणि एका कंपनीच नाव सांगितलं
  • तर ही आधीच तफावत मतांची त्या चिपमध्ये तिथे नाही का करत येत
  • निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही, या तफावतीची
  • पुढे तुम्ही कोर्टात जाल पण तिथेही तुम्हाला न्याय मिळणार नाही कारण हेच आधी तिथे जाऊन केस टाकून घोळ घालतात
  • मंत्री मंडळात कोणाला घ्यायचं नाही हे आधीच ठरलं
  • सेनेच्या 4 वरिष्ठ खासदारांना मंत्री मंडळात घ्यायचं नाही म्हणून त्या 4 जागा तिथे राष्ट्रवादीच्या आल्या, म्हणजे ठरवून पाडलं.
  • अमरावती नवनीत राणा निवडून आल्या, तणाव निर्माण करायला सिनियर चंद्रकांत नको म्हणून त्यांना पाडून MIM चा आणला. अनंत गीते सिनियर पडले, आणि काँग्रेसला नको होता तो निवडून आला बाळू धानोरकर.
  • आता राम मंदिर आणतील, पण त्या रामराज्यात काय घडलं होतं तर एक धोब्याने संशय घेतल्यानं रामाने सीतेला पाठवून दिलं मग आता एवढे लोक संशय घेतायत तर तुम्ही ईव्हीएमला का हटवत नाही?
  • निवडून आलेल्यांना आणि पडलेल्या सगळ्यांनाच धक्का बसलाय की निकाल असा कसा लागला.
  • शिक्यावर शिक्का मोर्तब, माझा मत शिक्याला . – मनसेकडून फॉर्म evm विरोधात तयार करण्यात आला आहे
  • मनसे सैनिकांनी हा अर्ज लोकांकडून भरून घ्यायचा आहे.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.