राज ठाकरे जवळपास दीड तास रांगेत उभे!
मुंबई : दक्षिण- मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात मतदान केलं. जवळपास दीड ते दोन तास थांबून राज ठाकरेंनी मतदान केले. यावेळी राज ठाकरे यांचे कुटुंबीयही मतदानासाठी उपस्थित होते. पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित यांनीही रांगेत उभं राहून मतदान केलं. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा लोकसभा निवडणूक […]
मुंबई : दक्षिण- मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात मतदान केलं. जवळपास दीड ते दोन तास थांबून राज ठाकरेंनी मतदान केले. यावेळी राज ठाकरे यांचे कुटुंबीयही मतदानासाठी उपस्थित होते. पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित यांनीही रांगेत उभं राहून मतदान केलं.
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा लोकसभा निवडणूक लढवत नाही. मात्र राज ठाकरे यांनी राज्यभरात जाहीर सभा घेऊन भाजपला विरोध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना राजकीय पटलावरुन हद्दपार करा, अशी हाक राज ठाकरे यांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रत्येक सभेत मोदी-शाह हटावचा नारा दिला. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. आता राज ठाकरेंच्या सभांचा नेमका कुणाला फायदा होतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे वि एकनाथ गायकवाड
दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत. तर काँग्रेसकडून एकनाथ गायकवाड यांना तिकीट देण्यात आलं आहे. धारावी झोपडपट्टी या मतदारसंघातच येते. त्यामुळे काँग्रेससाठी मोठी व्होटबँक इथे आहे. मात्र, गेल्यावेळी मोदीलाटेत दक्षिण मध्य मुंबईतही काँग्रेसला पराभव पत्कारावा लागला होता. यावेळी गणितं बदलणार की, राहुल शेवाळे पुन्हा जिंकणार, हे पाहावं लागेल.
VIDEO : राज ठाकरे मतदानासाठी सहकुटुंब दीड तास रांगेत उभे pic.twitter.com/GwtawogThv
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 29, 2019