मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र येण्याबाबत नेहमीच चर्चा होते. राज ठाकरे यांना आज या प्रश्नावर पुन्हा डिवचण्यात आलं. यावेळी त्यांनी दोनच शब्दात पण मिश्किल उत्तर दिलं. त्यामुळे राज आणि उद्धव एकत्र येणार का? याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. (raj thackeray statement on alliance with shiv sena)
तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं उत्तर दिलं. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा सवाल करण्यात आला. तेव्हा, म्हणजे काय? परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असं म्हणालो, अशी हजरजबाबी प्रतिक्रियाही राज यांनी दिली. दैनिक ‘लोकसत्ता’ने आज राज ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तर देतानाच उद्धव-राज एकत्र येणार का? या प्रश्नावरही उत्तर दिलं.
पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुणाशी युती होईल का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर निवडणुकीपर्यंत वाटचाल करताना पक्षाची स्वत:ची भूमिका असेल. बाकी पुढचे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी पाहू. सर्व महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची स्वत:ची भूमिका असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
कोरोना आजार आहे, पण मानसिक आजार आहे. आताच्या परिस्थितीत निवडणुकीचा विचार नको. लोकांची मानसिकता निवडणुका घेण्याची नाही. समाज राहिला तर निवडणुका घेण्यात अर्थ आहे. समाजाचं मन स्थिर होणं महत्वाचं आहे, हा समाज स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न करायला हवेत. नेत्यांनी समाज स्थिरस्थावर करण्यावर भर द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
आम्ही नाशिकमध्ये खूप कामं केली. 5 वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. पाणी प्रश्न मिटवला. हे चांगलं आहे की वाईट? लोकांनी साथ दिली तर हुरुप येतो. लोकांना नेमकं हवं काय आहे? इतरांसारखंच वागायचं का?, असा सवाल करतानाच कामाची अपेक्षा करायची आणि निवडणुकीवेळी मतदान वेगळ्याच पद्धतीने करायचं असं कसं चालणार? असं ते म्हणाले. (raj thackeray statement on alliance with shiv sena)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 1 June 2021 https://t.co/2CmEDn0zPG #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 1, 2021
संबंधित बातम्या:
निवडणुका प्रतिकांवर होतात; मोदींमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत: राज ठाकरे
पदोन्नतीतील आरक्षणासाठी रिपाइं रस्ता रोको; 7 जूनपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
(raj thackeray statement on alliance with shiv sena)