राज ठाकरेंसोबतच्या भेटीत काय ठरलं? शरद पवार म्हणतात….
नवी दिल्ली : दिल्लीतील राजकारणासोबतच महाराष्ट्रातील घडामोडीही वेगाने सुरु आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्ष रणनिती आखत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विविध पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही राज ठाकरेंनी पवारांच्या निवासस्थानी चर्चा केली. या भेटीत ईव्हीएमबाबत चर्चा झाल्याचं पवारांनी सांगितलंय. येत्या काळात ईव्हीएमवरच निवडणूक झाली तर विरोधी पक्षांनी […]
नवी दिल्ली : दिल्लीतील राजकारणासोबतच महाराष्ट्रातील घडामोडीही वेगाने सुरु आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्ष रणनिती आखत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विविध पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही राज ठाकरेंनी पवारांच्या निवासस्थानी चर्चा केली. या भेटीत ईव्हीएमबाबत चर्चा झाल्याचं पवारांनी सांगितलंय.
येत्या काळात ईव्हीएमवरच निवडणूक झाली तर विरोधी पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकावा, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली. पण आम्ही असं बोलू शकत नाही, असं पवारांनी सांगितलं. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि शरद पवार यांची बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना पवारांनी याबाबतची माहिती दिली.
शरद पवारांनी महाराष्ट्रातील निवडणुकीसंदर्भात राहुल गांधींसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. शिवाय राज्यातील दुष्काळावरही या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्षांचा दुसरा पर्याय दिसत नाही, म्हणून त्यांनी राजीनामा देणं योग्य नाही, असं पवारांनी बैठकीनंतर सांगितलं. त्यामुळे शरद पवारांनी राहुल गांधींचा राजीनाम्याचा निर्णय बदलण्यासाठी मनधरणी केल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात नवी राजकीय समीरकरणे दिसू शकतात. विरोधकांमधील सर्व गट एकत्र येऊन, विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना-रिपाइं या महायुतीविरोधात लढू शकतात, असे संकेत विरोधकांच्या गोटातून दिसू लागले आहेत. राज ठाकरे यांना परवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भेट घेतली. राज ठाकरे यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
संबंधित बातम्या :