राज ठाकरे 12 जानेवारीला परळीत येणार? कोर्टाचं समन्स; काय आहे प्रकरण?
यापूर्वी देखील सदर प्रकरणात राज ठाकरे यांना यापूर्वी दोन वेळा वॉरंट जारी करण्यात आलं होतं.
बीडः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे यांना परळीच्या (Parali) कोर्टाने समन्स बजावले आहे. येत्या 12 जानेवारीला त्यांना कोर्टात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. 22ऑक्टोबर 2008 रोजी राज ठाकरे यांना अटक झाली होती. त्याच्या निषेधार्थ मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परळी-गंगाखेड रोडवरील धर्मापुरी फाटा येथे एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक केली होती. या प्रकरणात राज ठाकरेंना हे समन्स बजावण्यात आलं आहे.
2008 मध्ये राज ठाकरे यांना अटकेच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी परळी गंगाखेड परिसरात निषेध व्यक्त केला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली.
त्यानंतर परळीी ग्रामीण पोलीस ठाण्यात राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट रद्द करून जमीन मिळवण्यासाठी राज ठाकरे परळीत12 जानेवारी रोजी येण्याची शक्यता आहे.
यापूर्वी देखील सदर प्रकरणात राज ठाकरे यांना दोन वेळा वॉरंट जारी करण्यात आलं होतं.
राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्ते पहिल्या तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध 6 जानेवारी 2022 रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. 10 फेब्रुवारी2022 पर्यंत त्यांना परळी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
सदर घटनेतील मनसेचे तत्कालीन पदाधिकारी संजय आघाव, अनीस बेग, शिवदास बिडगर, राम लटपटे, प्रल्हाद सुरवसे या पाच जणांनी कोर्टात हजर होऊन अजामीनपात्र वॉरंट रद्द केले.
मात्र रा ज ठाकरे यांच्याविरुद्ध 13एप्रिल रोजी दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा 12 जानेवारीचं समन्स राज ठाकरे यांना बजावण्यात आलंय.