राज ठाकरेंनी निमंत्रण स्वीकारलं, उदयनराजेंच्या आप्तेष्टांच्या विवाहाला हजेरी लावणार

उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच 'कृष्णकुंज' निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. (Raj Thackeray Udayanraje Bhosle )

राज ठाकरेंनी निमंत्रण स्वीकारलं, उदयनराजेंच्या आप्तेष्टांच्या विवाहाला हजेरी लावणार
राज ठाकरे-उदयनराजे भोसले भेट
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 4:25 PM

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांच्या नातेवाईकांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. नाशिकमध्ये उदयनराजेंच्या आप्तेष्टाचा विवाह आहे. नाशिक दौऱ्यात राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करतील. (Raj Thackeray to attend BJP MP Udayanraje Bhosle Relative Wedding)

उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. उदयनराजेंसोबत त्यांचे काही सहकारी होती. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण त्यावेळी स्पष्ट झालं नव्हतं. मराठा आरक्षण आणि राज्यातील राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने दोघांमध्ये खलबत झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर मनसेच्या ट्विटर अकाऊण्टवरुन ही भेट निमंत्रणासाठी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.

राज ठाकरे येत्या गुरुवारी म्हणजेच 4 मार्चला नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते मनसेच्या निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. परंतु, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्याला भेटण्यासाठी गर्दी करु नये, असे आवाहन राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

उदयनराजेंच्या भेटीगाठी

मराठा आरक्षणावर तोडगा निघावा म्हणून गेल्या काही दिवसांपासून सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या पूर्वी त्यांनी दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपचे नेते आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही त्यांनी भेट घेतली होती. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे मराठा आरक्षणाच्या कार्यक्रमात एकाच मंचावरही आले होते. (Raj Thackeray to attend BJP MP Udayanraje Bhosle Relative Wedding)

मुख्यमंत्र्यांशीही खलबतं

तत्पूर्वी उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. यावेळी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर काही प्रश्न उपस्थित केले होते.

संबंधित बातम्या:

मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय; राज ठाकरे यांनी ‘दादू’चं ऐकायचंच नाही, असं ठरवलंय का?

मोठी बातमी: भाजप नेते उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे यांच्या भेटीला

राज ठाकरे 4 मार्चला नाशिकच्या दौऱ्यावर; मनसेच्या निवडक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

(Raj Thackeray to attend BJP MP Udayanraje Bhosle Relative Wedding)

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.