‘दादू’चं निमंत्रण ‘राजा’ने स्वीकारलं, उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला राज ठाकरे येणार

उद्धव ठाकरे यांनी राज यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी फोन करुन निमंत्रण दिलं होतं.

'दादू'चं निमंत्रण 'राजा'ने स्वीकारलं, उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला राज ठाकरे येणार
Follow us
| Updated on: Nov 28, 2019 | 12:34 PM

मुंबई : ठाकरे कुटुंबातील आनंदाच्या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना राज ठाकरे हजर राहतील. स्वतः उद्धव ठाकरे यांनी राज यांना शपथविधी सोहळ्याला (Raj Thackeray to attend Sworn in) उपस्थित राहण्यासाठी फोन करुन निमंत्रण दिलं होतं.

शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शब्द उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता. ही वचनपूर्ती खुद्द उद्धव ठाकरे यांच्या रुपाने होणार आहे. कारण थेट शिवसेना पक्षप्रमुखच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार आहेत. सोबतच आदित्य ठाकरे यांचीही विधीमंडळात एन्ट्री झालेली आहे. ठाकरे कुटुंबातून आतापर्यंत कोणीही निवडणूक लढवली नव्हती. पण आता आदित्य ठाकरेंना आमदारकी आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद असा दुहेरी आनंदाचा क्षण ठाकरे कुटुंबासाठी आहे. त्यामुळे या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत.

राज ठाकरे शिवाजी पार्क परिसरातच ‘कृष्णकुंज’मध्ये राहतात. त्यामुळे शपथविधीला ते पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि मातोश्री यांच्यासह उपस्थित राहतील, असा विश्वास आधीपासूनच व्यक्त केला जात होता.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी ‘हे’ पद सोडलं!

याआधीही ठाकरे कुटुंबाच्या आनंदाच्या किंवा दुःखाच्या क्षणात राज यांनी साथ दिली आहे. फारकत घेतल्यानंतर बाळासाहेबांचं निधन असो, किंवा उद्धव ठाकरे यांचं आजारपण, राज ठाकरे स्वतः हजर राहिले होते. तर राज यांचे पुत्र अमित ठाकरेंच्या लग्नालाही उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब हजेरी लावली होती. आता ‘दादू’ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना ‘याचि देहि याचि डोळा’ पाहण्यासाठी ‘राजा’ उपस्थित राहील.

आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तिथे मनसेने विरोधात उमेदवार उभा केला नव्हता. ‘हे एक चांगलं कृत्य (गुडविल जेश्चर) आहे. तो निवडणूक लढवत असेल, तर त्याच्याविरोधात उमेदवार देता कामा नये, असं मला वाटतं, त्यांना काय वाटतं, हा वेगळा मुद्दा आहे, असं राज ठाकरे निवडणुकीपूर्वी म्हणाले होते.

जर आमच्या मुलांना निवडणूक लढवावी असं वाटत असेल, तर आम्ही त्यांना मागे खेचणार नाही. त्यामुळे आदित्यला निवडणूक लढवायची असेल, तर त्यात चूक काय? असंही राज ठाकरे ( Raj Thackeray to attend Sworn in) म्हणाले होते.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.