राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय टॅक्सी चालकाला रस्त्यात थांबवलं, खाली उतरवलं अन्…, वाचा संपूर्ण किस्सा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवडमधील जागतिक मराठी संमेलनात व्यंगचित्राविषयी बोलताना एक किस्सा सांगितला. वाचा सविस्तर...
पिंपरी चिंचवड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पिंपरी चिंचवडमधील जागतिक मराठी संमेलनात व्यंगचित्राविषयी बोलताना एक किस्सा सांगितला. राज ठाकरे यांनी एक जुना किस्सा (Raj Thackeray Taxi Driver story) सांगितला. व्यंगचित्र काढण्यासाठी प्रॅक्टिस खूप गरजेची असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासाठी ते विविध युक्ती वापरत असतात. त्याचं त्यांनी उदाहरण दिलं.
टॅक्सीचा किस्सा
मला एकदा टॅक्सीचं चित्र काढायचं होतं. त्यामुळे टॅक्सीवाल्याला बोलवायला सांगितलं. टॅक्सीवाला आल्यावर त्याने मला पाहिलं. मी त्याला बाहेर यायला सांगितलं. तो म्हणाला, मैनें क्या किया साहाब? त्याला मी सांगितलं. तू काही नाही केलंस. तू बाजूला ये मला टॅक्सीचा फोटो काढायचा आहे. मग मी त्या टॅक्सीचा फोटो काढला, असा एक मजेशीर किस्सा राज ठाकरेंनी बोलताना सांगितला.
कॉलेजमध्ये असताना मी आठ-दहा तास प्रॅक्टिस करायचो.एकदा मला बाळासाहेबांनी कचऱ्याचं चित्र काढायला पाठवलं होतं. म्हणजे कचरा कसा सांडतोय अन् त्यात काय काय आहे. याचं मी चित्र काढलं. ही प्रॅक्टिस गरजेची असते, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिलं पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य त्यांच्यासाठी समान असलं पाहिजे. आपण स्वत: गुजराती आहोत. त्यामुळे गुजरातला प्राधान्य देणं हे एका पंतप्रधानाला शोभत नाही”, असं म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मागच्या काही दिवसांपासून मनसे-भाजप युतीची चर्चा होत असताना राज ठाकरे यांचं हे विधान महत्वपूर्ण आहे.
राजकीय व्यंगचित्र काढताना समोर चेहरा आले की दिसावं लागतं. कुणाकडेही बघितलं की घंटी वाजते. त्यानंतर व्यंगचित्र काढण्याची सुरुवात होते. पण राज्यातील आजची परिस्थिती पाहिली तर घंटी वाजत नाही तर घंटा वाजू लागतात, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.