Raj Thackeray : ठाकरे विरुद्ध ठाकरे, राज ठाकरे भाजपाला आणि एकनाथ शिंदेंना का गरजेचे? जाणून घ्या चार मुद्द्यांतून

उद्धव ठाकरे यांच्याशी दुरावा आला असताना भाजपसाठी आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी राज ठाकरे एवढे का महत्वाचे आहेत असा सवाल आता राज्याच्या राजकारणात राजकीय पंडितांकडून उपस्थित केला जातोय? त्याची उत्तरंही आपण चार मुद्द्यातून शोधणारा आहोत.

Raj Thackeray : ठाकरे विरुद्ध ठाकरे, राज ठाकरे भाजपाला आणि एकनाथ शिंदेंना का गरजेचे? जाणून घ्या चार मुद्द्यांतून
ठाकरे विरुद्ध ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 4:12 PM

मुंबई : शिवसेना आणि भाजपची (Shivsena BJP Alliance) तीन दशकांची युती तुटली आणि राज्यात नवी समीकरणे तयार होऊन महाविकास आघाडी तयार झाली. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भाजपपासून दुरावले गेले. तसं ठाकरे घराणं आणि भाजपचं नातं हे अतिशय जुनं राहिलं आहे. मात्र आता भाजपने दुसऱ्या ठाकरेंना (Raj Thackeray) जवळ करायला सुरू केले आहे. त्यामुळे पुन्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे असाच संघर्ष दुरून दिसून येतोय. भाजप नेते आणि शिंदे गटातील नेत्यांची राज ठाकरेंसोबतची जवळीकही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज फडणवीसांनी राज ठाकरेंच्या घरी दाखल होत त्यांची भेट घेतली आहे. तसेच राज ठाकरेंकडूनही फडणवीसांचं दणक्यात स्वागत करण्यात आलंय. पण उद्धव ठाकरे यांच्याशी दुरावा आला असताना भाजपसाठी आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी राज ठाकरे एवढे का महत्वाचे आहेत असा सवाल आता राज्याच्या राजकारणात राजकीय पंडितांकडून उपस्थित केला जातोय? त्याची उत्तरंही आपण चार मुद्द्यातून शोधणारा आहोत.

  1. ठाकरे नावाचा दबदबा -अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून राज्याच्या राजकारणात ठाकरेंचा मोठा दबदबा हा नेहमीच राहिला आहे. नुसत्या ठाकरे नावामुळे कितीतरी मतं त्यांच्या मागे उभा राहतात, तसेच तरुणाईमध्ये ठाकरे नावाची जेवढी क्रेझ आहे, तेवढी तर कुठल्या नावाविषयी क्वचितच दिसते, त्यासाठी ठाकरे नाव हे खूप गरजेचं आहे, हेही कदाचित इतर राजकीय पक्षांना आणि भाजपाला उमगलं असावं.
  2. आगामी पालिका निवडणुका– तसेच ग्रामीण राजकारणापेक्षा शहरी राजकारणात मनसेचा आणि राज ठाकरेंचा बोलबाला हा कायम राहिला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका पाहता राज ठाकरे यांच्याशी जवळीक भाजपसाठी निवडणुका आणखी सोप्या करू शकते, हाही प्लॅन कुठेतरी भाजपच्या डोक्यात असणार आहे.
  3. हिंदुत्वासाठी ठाकरे गरजेचे– त्याच सोबत हिंदुत्वासाठी राज्यात ठाकरे बँड गरजेचा आहे, हेही भाजपच्या लक्षात आलं असावं, बाळासाहेब ठाकरे यांनी कायम प्रखर हिंदुत्वाची घेतलेली भूमिका, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीबरोबर जाऊन हिंदूत्व सोडल्याची होणारी टीका आणि त्यानंतर आता राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची उचलून धरलेली भूमिका हे सर्व पथ्यावर पडणारे आहे.
  4. उद्धव ठाकरेंना थेट भिडणारा नेता– त्याचबरोबर आणखी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरेंना थेट अंगावर घेऊ शकणारे नेतृत्व म्हणून तोडीस तोड राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं. राज ठाकरे यांची बोलण्याची शैली आक्रमक बाणा आणि धडाडीची निर्णय प्रक्रिया, यामुळे ही बराच फरक पडतो. त्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न आगामी काळात होऊ शकतो, असेही भाकीत राजकीय पंडित वर्तवत आहेत.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.