Raj Thackeray : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे नेते गृह विभागाच्या टार्गेटवर, अविनाश जाधव, संदीप देशपांडेंना पोलिसांची नोटीस

आता मनसे नेते गृह विभागाच्या टार्गेटवर आले आहेत. पोलिसांकडून मनसे नेत्यांना नोटीसा बजवण्यात आल्या आहेत. मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांना पोलिसांनी नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे नेते गृह विभागाच्या टार्गेटवर, अविनाश जाधव, संदीप देशपांडेंना पोलिसांची नोटीस
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे नेते गृह विभागाच्या टार्गेटवरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 10:39 PM

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मशीदीवरील भोंग्यांचा मुद्दा पुन्हा तापला आहे. कालच राज ठाकरेंची (Raj Thackeray) औरंगाबादेतल्या सभेवरून पुन्हा सरकारला इशारा दिला. त्यानंतर आता मनसे नेते गृह विभागाच्या (Dilip Walse Patil) टार्गेटवर आले आहेत. पोलिसांकडून (Maharashtra Police) मनसे नेत्यांना नोटीसा बजवण्यात आल्या आहेत. मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांना पोलिसांनी नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. ही नोटीस जुन्या प्रकरणात बजवल्याचेही सांगण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी काल औरंगाबादेत बोलताना, मी ईदपर्यंत वाट पाहणार आहे, नंतर मात्र ऐकणार नाही भोंगे उतरले पाहिजेत म्हणजे पाहिजेतच, असा इशारा सरकारला दिला. तसेच भोंगे नाही उतरले तर ईदच्या दुसऱ्या दिवशीपासून अजानवेळी हनुमान चालीसा दुप्पट आवाजात सुरू करायची असेही सांगितले. त्यावरूनच आता राज कारण तापलं आहे.

पोलिसांनी जुनी प्रकरणं काढली

कालच ठाणे पोलिसांनी जुनी प्रकरण तापासण्यास सुरूवात केली होती. त्यात मनसे नेते अविनाश जाधव यांना 2016 तील एका प्रकरणात नोटीस बजवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांविरोधात गृहविभाग एक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहेत. अविनाश जाधव यांना 2016 च्या गुन्ह्यात चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.  ही मनसेच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्याता घेण्याची रणनिती असल्याचेही बोलले जात आहे.  त्यामुळे पोलिसांनी या नोटीसा बजावल्याच्या चर्चा आहेत. राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून प्रश्न विचारले जात आहे. राज ठाकरेंची औरंगाबादेतील सभाही उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त लावून ही सभा पार पाडली.

मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेणार?

राज ठाकरेंनी ईद संपल्यानंतरचा जरी इशारा दिला असला तरी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी दुपारीच फेसबुक पोस्ट करत महाआरती रद्द करत असल्याचे सांगितले, तसेच मनसे कार्यकर्त्यांनी कुठेही आरती करू नये असे सांगितले. तर भोंग्याबाबतची भूमिका मी उद्यापर्यंत मांडेन, असेही त्या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यामुळे उद्या राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलं आहे. मात्र आता पोलीस एक्शन मोडमध्ये आल्याने याप्रकरणात नवं ट्विस्ट आलं आहे. आता पोलीस या प्रकरणात पुढे काय कारवाई करतील किंवा समीकरणं कशी बदलतील हे येणाऱ्या दिवसात कळेलच.

हे सुद्धा वाचा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.