Shivsena Dasara Melava 2022: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून येणार?

शिवाजी पार्क या मैदानावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका दरवर्षी मांडली आणि ती पूर्ण देशात गेली आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा विचार घेवूनच या ठिकाणी दसरा मेळावा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे एकनाथ शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्यासारखा हिंदुत्वाचा विचार करणारा नेता या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाऊ शकते, असे संकेत शिंदे गटाकडून देण्यात आले आहेत.

Shivsena Dasara Melava 2022: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून येणार?
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 8:27 PM

मुंबई : शिवसेना कुणाची यावरून उद्धव ठाकरे (uddhav thackeray)आणि एकनाथ शिंदे (eknath shinde)  गटात वाद सुरू असताना आता या वादाचा नवा अध्याय सुरू झालाय तो दुसरा मेळाव्याच्या निमित्ताने. दसरा मेळाव्याच्या(Shivsena Dasara Melava 2022) निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात घमासान सुरु आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला तोडीस तोड देण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. यासाठीस शिंदे गटाने देखील दसरा मेळाव्याचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मनसे राज ठाकरे (Raj Thackeray ) प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याची चर्चा रंगली आहे. मनसे यांनी प्रमुख पाहुणे उपस्थित रहावे याकरिता शिंदे गट जोरदार प्रयत्न करत आहे.

दसरा मेळाव्याच्या वादात नव ट्विस्ट

दसरा मेळावा कुणाचा होणार यावरुन वाद सुरु झालेला असतानाच, आता या वादात एक नवा ट्विस्ट आला आहे. एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात येणार असल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा थेट आमने सामने आले आहेत. दसरा मेळावा ही शिवसेना स्थापनेपासून परंपरा आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला आव्हान देण्यासाठी शिंदे गटाची व्यूहरचना आखणी सुरू आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला 56 वर्षांची परंपरा

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला 56 वर्षांची परंपरा आहे. शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क या मैदानावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका दरवर्षी मांडली आणि ती पूर्ण देशात गेली आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा विचार घेवूनच या ठिकाणी दसरा मेळावा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे एकनाथ शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्यासारखा हिंदुत्वाचा विचार करणारा नेता या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाऊ शकते, असे संकेत शिंदे गटाकडून देण्यात आले आहेत.

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटी प्रयत्नशील

कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने देखील दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे

शिवतीर्थावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळावा घेतल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची चर्चा आहे. यापूर्वीही बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातही इतर पक्षातील नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात येत असे. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे, तत्कालीन काँग्रेस नेते शरद पवार, कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. ‘वारसा हा वास्तूचा नसतो, विचारांचा असतो’ ही भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.