राज ठाकरे तयारीला लागले; सहा दिवस विदर्भात तळ ठोकणार

18 सप्टेंबरपासून राज ठाकरे यांचं मिशन विदर्भ सुरु होत आहे. या दौऱ्याची तयारी सुरु झाली असून, मनसे नेत्यांनी आज नागपूर येथील तयारीचा आढावा घेतला. या दौऱ्यात राज ठाकरे तब्बल सहा दिवस विदर्भात तळ ठोकून असणार आहेत.

राज ठाकरे तयारीला लागले; सहा दिवस विदर्भात तळ ठोकणार
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 4:49 PM

मुंबई : एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. यानंतर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे ती महापालिका निवडणुकांची. मनसे प्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी देखील मनसे पक्षाला मोठेया ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. राज ठाकरे चांगलेच सक्रिय झाले आहेत. लवकरच राज ठाकरे विदर्भ(Vidarbha) दौरा करणार आहेत. कार्यकर्त्यांनी याची जोरदार तयारी सुरु केली आहे.

18 सप्टेंबरपासून राज ठाकरे यांचं मिशन विदर्भ सुरु होत आहे. या दौऱ्याची तयारी सुरु झाली असून, मनसे नेत्यांनी आज नागपूर येथील तयारीचा आढावा घेतला. या दौऱ्यात राज ठाकरे तब्बल सहा दिवस विदर्भात तळ ठोकून असणार आहेत.

या दौऱ्यात राज ठाकरे नागपूर, चंद्रपुर आणि अमरावती मुक्काम करणार आहेत. मनसे संघटनेला बळ देणे, पदाधिकाऱ्यांशी चर्चा, नविन नियुक्त्या आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीची तयारी, यासाठी राज ठाकरे यांचा सहा दिवस विदर्भ दौरा करणार आहेत.

राज ठाकरे 19 सप्टेंबरला नागपूरला मुक्कामी असून इथल्या बैठका घेणार आहेत. यानंतर 20 सप्टेंबरला ते चंद्रपूर येथे मुक्काम करणार आहेत. तर 21 आणि 22 सप्टेंबरलाते अमरावती येथे आढावा बैठका बैठक घेणार आहेत अशी माहिती मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिली.

दरम्यान, राज ठाकरे दौरे घेत असतानाच राज्यात मनसे भाजपच्या युतीची चर्चा रंगली आहे. राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्याचे संकेत दिले आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.