कितीही विकास करा, जोपर्यंत लोंढे… राज ठाकरे यांचा महायुतीच्या सभेत परप्रांतीयांवर हल्ला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिला आहे. आपला पाठींबा भाजपाला नसून केवळ मोदींना आहे असेही राज ठाकरे यांनी म्हटले होते. महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राज यांनी सुरुवात केली आहे. या लोकसभा निवडणूकीत मनसेचा एकही उमेदवार उभा राहीलेला नाही. तरीही महायुतीसाठी राज ठाकरे यांची ही तिसरी सभा आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा हाती घेताल आहे. ठाणे जिल्ह्यातील इतकी लोकसंख्या वाढली आहे की शहराची बजबजपुरी झाली आहे. कोणी एकेकाळी नाही. 30 ते 35 वर्षाचा काळ असेल. पण अशी टुमदार शहरं उभी राहिली पाहिजे. हा ठाणे जिल्हा देशातील… मी काय बोलतो ते लक्षात ठेवा. ठाणे लोकसभा, कल्याण लोकसभेची संयुक्त सभा आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून सांगतो आज वेगवेगळ्या राज्यातून लोक येत आहेत. तुम्ही कितीहा काम करा, कितीही रस्ते बांधा, पूल बांधा. तुम्ही बाहेरचे लोंढे थांबणार नाही, तुम्ही कितीही विकास केला तरी या शहरात काही घडणार नाही. खासदार श्रीकांत शिंदे आणि म्हस्के यांनी कितीही फंड आणले तरी… मी फक्त ठाणे जिल्ह्याबद्दल बोलतो. सर्व बाहेरून लोकं येत आहेत. त्याचे सर्वांत जास्त प्रमाण ठाणे जिल्ह्यात असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे पुढे म्हणाले आज संध्याकाळपासून खोकला सुरु झाला. वातावरणच इतक गढूळ झाले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की फेव्हीकॉल का मजबूत जोड आहे. बाहेरून पण फेव्हीकॉल लावा असेही ते यावेळी राज म्हणाले. आज आपण आनंदमठात गेलो. आनंद दिघे आणि माझे वेगळे मैत्रीपूर्ण संबंध होते. आज आनंदमठात गेलो तर वेगळेच होते. स्वच्छता दिसत होती. त्यावेळी दहा वाजेपर्यंत सभा आटोपा असा प्रकार नव्हता. गाद्या लोड ओले होणे, दव पडणे असे प्रकार होते असे राज ठाकरे यांनी सांगितले.
मूळकरदात्याच्या हाती काही नाही
टुमदार शहर ठाणे होते. तलावांचे शहर बुजवले गेले. 35 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आता इमारतींचे जंगल आहे. ठाणे आणि लोकसभा संयुक्त सभा आहे. तुम्ही कितीही काम करा. रस्ते बांधले तरी ती कमी पडतील. परंतू बाहेरचे लोंढे सर्वात जास्त येण्याचे प्रमाण हे ठाणे जिल्ह्यात आहे. महापालिका कशी ठरते. लोकसंख्येवर ठरते. पुण्यात किती महापालिका ? दोन महानगर पालिका आहेत. परंतू एका ठाणे जिल्ह्यात सात – आठ महानगर पालिका आहे. हे प्रश्न तुम्ही लोकसभेत मांडा. आमच्यावरील बोजा आता आवरा. मेट्रो किती आणल्या तरी मूळ करदात्याच्या हाती काही लागणार नाही असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.