Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : ‘संजय राऊत… कॅमेरा आला की सुरु, कॅमेरा हटला की नॉर्मल’, राऊतांची नक्कल करत राज ठाकरेंची टोलेबाजी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत यांची भाषणशैली आणि बोलण्याची पद्धत याची नक्कल करत राज ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. इतकंच नाही तर महापालिका निवडणुका (Municipal Election) पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावरुन राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. म

Raj Thackeray : 'संजय राऊत... कॅमेरा आला की सुरु, कॅमेरा हटला की नॉर्मल', राऊतांची नक्कल करत राज ठाकरेंची टोलेबाजी
राज ठाकरे यांची संजय राऊतांवर जोरदार टीकाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 8:54 PM

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) 16 व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत यांची भाषणशैली आणि बोलण्याची पद्धत याची नक्कल करत राज ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. इतकंच नाही तर महापालिका निवडणुका (Municipal Election) पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावरुन राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. मनसेचा वर्धापन दिन पहिल्यांदाच मुंबईबाहेर घेण्यात आला. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

राज ठाकरेंकडून संजय राऊतांची नक्कल

राज ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यावेळी राज यांनी संजय राऊत यांची नक्कलही केली. ‘ते संजय राऊत… किती बोलतात. सगळ्यांची एक अॅक्शन असते. चॅनल लागलं की हे सुरु, कॅमेरा हटला की सगळं नॉर्मल. एकदा असाच एका सभेला गेलो होतो. सगळं साधं व्यवस्थित बोलत होते. तेवढ्यात त्यांच्या नावाची घोषणा नाही. मी आलो.. भाषण करतो.. म्हटलं ये. आज.. इखे जमलेले सर्व…. अरे आता नीट बोलत होता. काय प्रॉब्लेम झाला. डोळे मोठे करणार, भुवया उडवणार.. किती बोलतो. प्रश्न बोलायचा नाही. आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत. भविष्यातल्या महाराष्ट्रातल्या पिढ्या पाहत आहेत हे. ते उद्या काय शिकतील? असा सवाल करत राज यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरेंवर निशाणा

‘निवडणुका लांबणीवर पडणार हे मी नोव्हेंबरमध्ये सांगितलं होतं. निवडणूक आली की निवडणूक चढायला लागते. आता तुम्हाला बरोबर ते कळलं असेल. वातावरणात निवडणूक यायला लागते. मला ती वातावरणात दिसेना. आमच्या ओबीसी समाजाचं कारण पुढे केलं… सगळं खोटं. यांना निवडणूक घ्यायचीच नव्हती. मला कुणाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत, दुखण्याबाबत बोलायचं नाही. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नाही, पण मला त्याबाबत काही बोलायचं नाही. पण खरं कारण ते आहे. तीन महिने निवडणुका पुढे म्हणजे जून, धो धो पाऊस.. सामान्यांना निवडणुकांचं काही देणं घेणं नाही. निवडणुका फक्त उभं राहणाऱ्यांसाठी महत्वाच्या आहेत. साला आपली कापली जाते की राहते, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.

365 दिवस शिवजयंती साजरी करा

21 मार्चला शिवजयंती आहे. आता तारखेनं झाली, आता तिथीनं आहे. आपल्या शिवछत्रपतींची जयंती आहे. आपली ओळखच त्यांच्यामुळे आहे. नाहीतर आपली ओळख काय? आपण जेव्हा सांगतो आपण मराठी आहोत म्हणजे कोण आहोत. आपण मराठी भाषा बोलणारे आहोत म्हणून मराठी आहेत. मराठी लोकं कुठं राहतात, आमचा राजा छत्रपती जिथला होता तिथे आम्ही राहतो. शिवाजी राजांच्या भूमीत आम्ही राहतो. आता शिवजयंती तारखेने करावी की तिथीनं करावी, 365 दिवस करा.. जेव्हा वाटेल तेव्हा करा.. तिथीनं का करतोय? कारण आपले सण तिथीनं साजरे करतो, तारखेनं नाही साजरे करत. हा माझ्या राजाचा सण आहे. 21 तारखेला आपण सगळ्यांनी धूमधडाक्यात शिवजयंती साजरी करावी, असं आवाहन राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलंय.

इतर बातम्या :

Video : राज्यपालांना शिवराय कळलेत का? राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंनी घेतला समाचार

Raj Thackeray : महापालिका निवडणुका पुढे का ढकलल्या? राज ठाकरेंनी सांगितलं कारण; मुख्यमंत्र्यांवर निशाणा

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.