माझ्याकडून एकच गोष्ट नाही झाली….काय म्हणाले राज ठाकरे

राज ठाकरे यांनी निवडणूकीच्या धामधूमीत टीव्ही 9 मराठी चॅनलला रोखठोक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी विविध राजकीय प्रश्नांवर आपली भूमिका विशद केलेली आहे. शरद पवार यांच्याविषयी राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.

माझ्याकडून एकच गोष्ट नाही झाली....काय म्हणाले राज ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 5:58 PM

राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूकीत आपले उमेदवार उभे केलेले आहेत. विधानसभा निवडणूकीचा प्रचार टीपेला पोहचला असताना राज ठाकरे यांनी टीव्ही 9 मराठीला मुलाखत दिली आहे. टीव्ही 9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी ही मुलाखत घेतली.या मुलाखतील राज ठाकरे यांनी राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील रोखठोक भाष्य केले आहे. या शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना ज्यांनी आयुष्यात काही काम केले नाही ते माझ्यावर बोलत आहे. या संदर्भात राज ठाकरे यानी जोरदार उत्तर दिले आहे.

उमेश कुमावत यांनी या मुलाखतीत राज ठाकरे यांना शरद पवार यांच्या राज ठाकरे यांनी उभ्या आयुष्यात काही केले नाही या विधानाची क्लीप दाखविली. ही क्लीप राज ठाकरे यांनी पाहीली आणि त्याला त्यांनी उत्तर दिले. या वेळी राज ठाकरे म्हणाले की त्यांना वयानुसार गोष्टी काही गोष्टी आठवत नसेल. मी ज्या अनेक गोष्टी केल्या आहेत ना, त्याची एक पुस्तिका पाठवतो असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. राज ठाकरे यांनी यावेळी म्हणाले की माझ्याकडून एक गोष्ट नाही झाली. मी जातपात नाही पाळली. मी जातीवादी राजकारण कधीही केलं नाही. शरद पवार यांचे राजकारण महाराष्ट्राला माहिती आहे. मागच्या बाजूने पिल्ले सोडायची हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. छोट्या मोठ्या संघटना उभ्या करायच्या त्यांना पैसे पुरवायचे या गोष्टी सर्वांना माहीत आहे. काही गोष्टी मला पर्सनली बोलायच्या नाही. नाही तर त्याही बोललो असतो. पण त्याचा राजकारणाशी संबंध नाही असेही राज ठाकरे म्हणाले.

शरद पवार जातीयवादी का ?

शरद पवार हे जातीयवादी का आहेत? याचं उदाहरण राज ठाकरे यांनी यावेळी दिले. आपण कधीही जातीय राजकारण केलेले नाही.शरद पवार यांच्या बद्दलचे एक उदाहरण सांगतो असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की याचं सोपं उदाहरण. त्याचं फुटेज सर्वांकडे आहे. छगन भुजबळांना एका कार्यक्रमात पुण्यात पुणेरी पगडी घातली होती. शरद पवार यांनी ती काढली आणि ज्योतीराव फुल्यांची पगडी घातली. ज्योतिराव फुल्यांची पगडी घालण्याबाबत काही म्हणणं नाही. ही घालू नका, ही घाला. ते फुटेज पाहा. सत्काराच्यावेळी जी गोष्ट घडली ती झाली.

हे सुद्धा वाचा
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.