राज ठाकरे तब्बल 14 वर्षांनी दिल्लीत!

मनसे प्रमुख राज ठाकरे आज दिल्लीला रवाना झाल्यापासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याचं कारणही तसंच आहे. कारण राज ठाकरेंची ही दिल्ली भेट तब्बल 14 वर्षांनंतर होत आहे. यापूर्वी ते 2005 मध्ये दिल्लीत गेले होते.

राज ठाकरे तब्बल 14 वर्षांनी दिल्लीत!
Follow us
| Updated on: Jul 07, 2019 | 11:22 PM

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे आज दिल्लीला रवाना झाल्यापासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याचं कारणही तसंच आहे. कारण राज ठाकरेंची ही दिल्ली भेट तब्बल 14 वर्षांनंतर होत आहे. यापूर्वी ते 2005 मध्ये दिल्लीत गेले होते.

राज ठाकरे याआधी 2005 ला जाण्याचे कारणही असेच खास होते. ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना ‘बाळ केशव ठाकरे, अ फोटोबायोग्राफी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी दिल्लीत गेले होते. त्यानंतर मे 2005 रोजी अटल बिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते.

यानंतर काही काळातच राज ठाकरे यांनी 2005 मध्येच राज ठाकरेंनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आणि मार्च 2006 ला आपला नवा राजकीय पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केला. पक्षस्थापनेनंतर मात्र राज ठाकरे यांनी दिल्लीकडे ढुंकुनही पाहिले नाही. त्यानंतर त्यांनी आपले सर्व लक्ष महाराष्ट्रावरच केंद्रीत केले.

‘पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणानंतरही दिल्ली भेट नाहीच’

दरम्यान, राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरलेल्या नीट परीक्षेच्या  नियमांबद्दल दूरध्वनीवर बोलणे झाले होते. त्यावेळी मोदींनी राज ठाकरेंना दिल्लीत सदिच्छा भेट देण्याचे आणि स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते. मात्र, राज ठाकरेंचे दिल्लीला जाणे झालेच नाही. त्यावेळी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध मैत्रीपूर्ण होते. मात्र, पुढे हा मैत्रीचा प्रवास कट्टर राजकीय विरोधकापर्यंतही झाला.

राज ठाकरे मुलगा अमितच्या लग्नाची पत्रिका तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यासाठी जानेवारी महिन्यात स्वतः दिल्लीला जाणार होते, अशी चर्चा झाली. मात्र, त्यावेळीही ते दिल्लीला गेलेच नाही. त्यावेळी त्यांनी आपले स्वीय सचिव हर्षल देशपांडे यांना राहुल गांधी आणि अन्य राजकीय नेत्यांना लग्नाची पत्रिका देण्यासाठी पाठवले होते.

दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची सोमवारी (8 जुलै) दुपारी 12 वाजता दिल्लीत भेट घेणार आहेत. यासाठी राज ठाकरे आज दिल्लीमध्ये दाखल झाले. या भेटीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी ईव्हीएम विरोधातील आपली भूमिका राज निवडणूक आयुक्तांकडे स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेविरोधात 10 सभा घेतल्या. या सभांना लोकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र, राज यांच्या या सभांना मिळालेल्या प्रतिसादाचं रूपांतर मतांमध्ये झालं नाही. त्यामुळे ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा संशयही व्यक्त केला गेला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 2 दिवसांपूर्वीच राज ठाकरेंची भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी राजू शेट्टी ईव्हीएम आणि सरकारविरोधात मोठे आंदोलन छेडणार आहेत. या आंदोलनात राज ठाकरे यांनी सहभागी व्हावं यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्याचेही बोलले जात आहे. राज ठाकरे या आंदोलनात सहभागी झाले, तर आंदोलनाला एक वेगळं स्वरूप प्राप्त होईल, असा अंदाज विरोधीपक्ष वर्तवत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.