राज ठाकरे तेव्हाच म्हणाले होते, अमितला निवडणूक लढवण्यापासून रोखणार नाही!

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड होत असल्याचा ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी मंजुरी देत एकच जल्लोष केला. (Amit Thackeray MNS Adhiveshan)

राज ठाकरे तेव्हाच म्हणाले होते, अमितला निवडणूक लढवण्यापासून रोखणार नाही!
Follow us
| Updated on: Jan 23, 2020 | 4:27 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे (Amit Thackeray MNS Adhiveshan) यांना लॉन्च करण्यात आलं. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड होत असल्याचा ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी मंजुरी देत एकच जल्लोष केला. (Amit Thackeray MNS Adhiveshan)

अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी 27 व्या वर्षी पहिलं जाहीर भाषण केलं. अमित ठाकरे यांचा जन्म 24 मे 1992 रोजी झाला. 27 वर्षीय अमित ठाकरे हे आता सक्रीय राजकारणात उतरले आहेत. मात्र चुलतभाऊ आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे अमित ठाकरेही येत्या काळात संसदीय राजकारणात आले तर आश्चर्य वाटायला नको. कारण यापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

विधानसभा निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढवण्याबाबतच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा करण्यात आली. त्यावेळी मनसेने आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणारे पहिलेच ठाकरे ठरले होते. त्याबाबतच ऑक्टोबर 2019 मध्ये राज ठाकरेंना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती.

त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते, “आदित्य ठाकरे असो किंवा पुत्र अमित ठाकरे, त्यांना निवडणूक लढवावीशी वाटत असेल, तर त्यात गैर काय? निवडणूक लढवावी की नाही, हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. उद्या माझ्या मुलाला निवडणुकीत उतरायचं असेल, आणि तो याबाबत ठाम असेल, तर मी नाही म्हणणार नाही. पण त्याला स्वतःविषयी खात्री वाटत नसेल तर कोण काय करु शकेल? जर आमच्या मुलांना निवडणूक लढवावी असं वाटत असेल, तर आम्ही त्यांना मागे खेचणार नाही. त्यामुळे आदित्यला निवडणूक लढवायची असेल, तर त्यात चूक काय?”

दुधापेक्षा दुधाची साय घट्ट

दुधापेक्षा दुधाची साय घट्ट असते. अमित पुढे खूप चांगलं काम करणार आहे, तो खूप मोठा व्हावा”, अशी आशा अमित ठाकरे यांच्या आजी कुंदा ठाकरे यांनी व्यक्त केली.   नेतेपदी निवड झाल्यानंतर अमित यांच्या आई शर्मिला ठाकरे, आजी कुंदा ठाकरे आणि पत्नी मिताली ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बातचीत केली.

संबंधित बातम्या 

दुधापेक्षा दुधाची साय घट्ट असते, नातू अमितच्या लाँचिंगवर आजी कुंदा ठाकरेंची प्रतिक्रिया  

तीन महिन्यांत तीन ठाकरेंची राजकारणात ग्रँड एन्ट्री

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.