नाशिकमध्ये पवारांच्या सभेत राज ठाकरेंचे पोस्टर झळकले

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाशिक येथील सभास्थळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील पोस्टरवरुन गायब असल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पोस्टर मात्र सभेच्या प्रवेशद्वारावर लावलेले दिसले. शरद पवार नाशिक लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी  नाशिकमधील सैय्यद पिंपरी गावात आले होते. सभेच्या ठिकाणी मंचावर लावण्यात […]

नाशिकमध्ये पवारांच्या सभेत राज ठाकरेंचे पोस्टर झळकले
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाशिक येथील सभास्थळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील पोस्टरवरुन गायब असल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पोस्टर मात्र सभेच्या प्रवेशद्वारावर लावलेले दिसले. शरद पवार नाशिक लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी  नाशिकमधील सैय्यद पिंपरी गावात आले होते.

सभेच्या ठिकाणी मंचावर लावण्यात आलेल्या पोस्टरवर विखे पाटील यांच्या फोटोला स्थान न मिळाल्याने उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा झाली. मात्र याठिकाणी मनसेचे अस्तित्व ठळकपणे पाहायला मिळाले. अगदी प्रवेशद्वारावरच राज ठाकरेंच्या पोस्टरसह मनसेचे झेंडे लावण्यात आले होते. सैय्यद पिंपरी परिसर तसा शिवसेनेचा गड मानला जातो. अशा भागात सभा घेऊनही सभेला फारसा प्रतिसाद न मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, सभेत शरद पवार यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशात अनेक गंभीर प्रश्न आहेत. असे असतानाही मोदींना मात्र माझ्या कुटुंबाची चिंता लागली आहे, असा टोला पवार यांनी मोदींना लगावला.

‘शेतकऱ्यांना पैसा मिळू नये हीच मोदी सरकारची मानसिकता’

आपल्या भाषणात शरद पवार यांनी शेतीच्या मुद्द्यावर मोदी सरकारला चांगलेच फैलावर घेतले. ते म्हणाले, सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अजिबात आस्था नाही. कांद्याचे भाव वाढले, तर शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतात. मात्र, संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारच्या काळात कांदा महागला म्हणून भाजपने आंदोलने केली होती. शेतकऱ्यांना पैसा मिळू नये, हीच मोदी सरकारची मानसिकता आहे. म्हणूनच कांद्याचे भाव पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची सामूहिक शक्तीच चमत्कार करू शकते.

‘शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवल्याचा मोदी सरकारचा दावा खोटा’

पंतप्रधान मोदी यांच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवल्याच्या दाव्याचा समाचार घेताना पवार यांनी मोदी सरकारचा दावा खोटा असल्याचे म्हटले. तसेच शेती मालाच्या भावात संतुलन राखण्यात सरकार अपयशी ठरल्याचेही नमूद केले. उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना घामाची किंमत मिळायला हवी. गहू आणि तांदूळ दरात या सरकारने अत्यल्प वाढ केली. आघाडी सरकारच्या तुलनेत सर्वच शेतीमाल उत्पादनांच्या दरात मोदी सरकारने अत्यल्प वाढ केली आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढल्याचे पवार म्हणाले.

कारवाई लष्करानं केली, मात्र 56 इंच छाती मोदी फुलवत आहे

मोदींच्या सभांमध्ये होणाऱ्या सैन्याच्या उल्लेखावर बोलताना पवार म्हणाले, ‘मोदी प्रत्येक ठिकाणी पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्याचे सांगतात. ही कारवाई लष्कराने केली, मात्र 56 इंच छाती कोण फुलवतंय तर मोदी.’ अभिनंदनला सोडवले यासाठी सरकारचे अभिनंदन करताना कुलभूषणला का सोडले नाही, असाही प्रश्न पवार यांनी विचारला. तसेच हेलिकॉप्टर पडल्याने शहीद झालेल्या मांडवगणे यांच्या कुटुंबीयांनीही सरकारला याचा राजकीय फायदा न घेण्याचा सल्ला दिल्याची आठवण पवार यांनी करुन दिली.

पाहा व्हिडीओ:

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.