Eknath Shinde : राज ठाकरेंपाठोपाठ ‘हा’ मोठा नेता वर्षा बंगल्यावर, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
वर्षा बंगल्यावरील बाप्पांच्या दर्शनासाठी राज ठाकरे हे दाखल होणार असल्याची चर्चा ही दिवसभर होती. त्याअनुशंगाने ते रात्री 8 च्या दरम्यान दाखलही झाले. शिवाय 40 मिनिटे त्यांच्यात आणि मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चाही झाली. पण त्यानंतर इम्तियाज जलील हे काही वेळेपुरतेच दाखल झेले पण त्याची चर्चा विविध अंगाने आता सुरु झाली आहे.
मुंबई : यंदाचा (Ganesh Festival) गणेशोत्सव जेवढ्या दणक्यात घडत आहे तेवढाच तो राजकीयदृष्ट्या चर्चेचाही ठरत आहे. (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तर पहाटे 4 पर्यंच विविध सामाजिक गणेश मंडळातील गणरायाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरही काही कमी रीघ नाही, येथे वर्दळ आहे ती राजकीय नेत्यांची. मंगळवारी रात्री तर मनसे प्रमुख राज ठाकरे हे सर्व कुटुंबियांसोबत दर्शनासाठी दाखल झाले होते. ते सर्वश्रुतही होते, पण राज ठाकरे वर्षाहून निघाले आणि एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानातील बाप्पांच्या दर्शनासाठी दाखल झाले ते एमआयएमचे (Imtiaz Jaleel) खा. इम्तियाज जलील. इम्तियाज जलील थेट वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने आश्चर्याचा धक्काच बसला.
चित्रिकरणालाही मज्जाव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी खासदार इम्तियाज जलील हे देखील झाले होते. अवघ्या काही वेळासाठी ते दाखल झाले असले तरी माध्यमांच्या कॅमेरात टिपले गेलेच. ज्यावेळी इम्तियाज जलील हे वर्षा बंगल्यावर दाखल होत होते तेव्हा माध्यमांनाही तेथील पोलिसांनी चित्रिकरणास मज्जाव केला. पण जलीली हे वर्षा बंगल्यामध्ये जात असतानाचे चित्रिकरण करण्यात आले आहे.
सर्वांनाच आश्चर्य