Breaking News : भोंग्याचा वाद! सर्वपक्षीय बैठकीकडे राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांचीही पाठ

भोंग्यांवरुन बिघडत चाललेल्या कायदा-सुव्यवस्थेवर या बैठकी चर्चा करण्यात येणार होती.

Breaking News : भोंग्याचा वाद! सर्वपक्षीय बैठकीकडे राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांचीही पाठ
राज ठाकरे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 12:33 PM

मुंबई : महाराष्ट्रात भोंग्याचा वाद (Loudspeaker Controversy) निकाली निघावा, त्यावर तोडगा काढला जावा, याउद्देशानं सर्वपक्षीय बैठकीचं (All party meet) आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे यांच्यासह देवेंद्र फडणवीस (Raj Thackeray & Devendra Fadnavis) गैरहजर राहिलेत. तर दुसरीकडे इम्तियाज जलील आणि प्रकाश आंबेडकरांनीही बैठकीला दांडी मारली आहे. भोंग्याच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली. भोंग्याच्या मुद्द्यावरुन सध्या राज्याचं राजकारण तापलंय. त्यामुळे चर्चेतून तोडगा काढण्यासाठी आणि त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेण्याचा निर्णय घेतला होता. या बैठकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसह जाणार नसल्याची माहिती समोर आली. भोंग्यांवरुन बिघडत चाललेल्या कायदा-सुव्यवस्थेवर या बैठकी चर्चा करण्यात येणार होती.

भोंग्याच्या मुद्द्यावरून आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत काय होतं, याकडे लक्ष लागलेलं होतं. दरम्यान, या भोंग्याचा मुद्दा ज्यांनी उपस्थित केला, ते राज ठाकरेंच या बैठकीला हजर राहणार नाही आहे. मनसेकडून राज ठाकरे यांच्याऐवजी बाळा नांदगावकर यांच्याकडून सर्वपक्षीय बैठकीला हजेरी लावली जाणार आहे. तर दुसरीकडे फक्त मनसेच नव्हे तर भाजपसबोत इतरही अनेक बडे नेते भोंग्याबाबत घेतल्या जाणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहणार असल्याचं सांगितलं जातंय.

कोण कोण सर्वपक्षीय बैठकील जाणार नाही?

  1. राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
  2. देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते
  3. इम्तियाज जलील, एमआयएम खासदार
  4. प्रकाश आंबेडर, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष

सकाळी 11 वाजता सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं. मात्र ज्यांनी भोंग्याच्या मुद्द्यांवरुन आक्षेप नोंदवला होते, ते महत्त्वाचे नेते बैठकीला नसल्यानं या बैठकीला नसणार आहेत. त्यामुळे या बैठकीला महत्व का देण्यात आलं नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

…म्हणून गैरहजेरी?

सर्वपक्षीय बैठकीत राज्याच्या गृहमंत्र्यांकडून काही जीआर दिले जाण्याची शक्यता होती. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातही वेगवेगळे जीआर भोंग्याबाबत काढण्यात आले होते. या जीआरच्या प्रती या बैठकीत दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यानुसार राज्यातील बेकायदेशीर भोंग्यावर कारवाई होतेच, असाही युक्तिवाद होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. यामुळे राज ठाकरे, देवेंद्र फडणवीसांसह दिग्गजांनी बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला का, असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.

3 मे रोजीची अल्टिमेटम..

3 मेपर्यंत राज्यातील मशिदींवर भोगें काढले नाही, तर त्यावर मनसे स्टाईल एक्शन घेण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला होती. मशिदींवर भोंग्यांना हनुमान चालिसेनं उत्तर देऊ, अशा राज ठाकरेंनी ठाण्यातील उत्तर सभेत म्हटलं होतं. त्यानंतर राज्य सरकारही सतर्क झालंय. भोंग्याबाबतचं राजकारणही तापतंय. त्यापार्श्वभूमीवर आज घेतल्या जाणाऱ्या सर्वपक्षीय बैठकील महत्त्व प्राप्त झालं होतं. मात्र राज ठाकरेंच या बैठकील जात नसल्यानं या बैठकीचं महत्त्व किती उरलंय, असही मुद्दा आता उपस्थित होतोय.

बैठकीत काय झालं?

सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांची धार्मिकस्थळी असलेल्या भोंग्याबाबतची मतं जाणून घेतल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. गृहमंत्र्यांनी भोंगे संदर्भात सर्वोच्य न्यायालय नेमके काय आदेश दिले आहे याची माहिती दिल्याचं सूत्रांनी म्हटलंय. तसंच सामाजिक तेढ निर्माण करू नका ही भूमिका सरकारची असल्साचे गृहमंत्र्यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ : बैठकीआधी नांदगावकर काय म्हणाले?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.