पवार कुटुंब आदर्श, शरद पवार, अजित पवार आणि पार्थ एकत्रित बसून एका मिनिटात प्रश्न सोडवतील : राजेश टोपे

शरद पवार, अजित पवार आणि पार्थ पवार एकत्रित बसून हा विषय एका मिनिटात संपवतील, असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे (Rajesh Tope on Sharad Pawar Parth Pawar issue).

पवार कुटुंब आदर्श, शरद पवार, अजित पवार आणि पार्थ एकत्रित बसून एका मिनिटात प्रश्न सोडवतील : राजेश टोपे
Follow us
| Updated on: Aug 15, 2020 | 1:55 PM

जालना : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कुटुंब आदर्श असल्याचं म्हटलं आहे. तसेच शरद पवार, अजित पवार आणि पार्थ पवार एकत्रित बसून हा विषय एका मिनिटात संपवतील, असाही विश्वास व्यक्त केला आहे (Rajesh Tope on Sharad Pawar Parth Pawar issue). ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी माध्यमांनी या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करु नये, असं आवाहनही केलं.

राजेश टोपे म्हणाले, “पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या घरात एकोपच असतो. माध्यमांनी याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करु नये. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं घर आदर्श घर आहे. पार्थ पवार माझा मित्र आहे. शरद पवार त्यांना घरात बसून जे काही आहे ते सांगतात. शरद पवार ज्येष्ठत्वाच्या नात्याने अधिकाराने काही बोलले असतील तर तो त्यांच्या घरातील मुद्दा आहे.”

“ते एक आदर्श घर असल्याने हा मुद्दा सुटायला काहीही अडचण येणार नाही. माझ्या दोन पीढ्यांचा पवार कुटुंबाशी संबंध आहे. मी अजित पवार यांना चांगलं ओळखतो, पार्थ पवार माझा मित्र आहे. शरद पवार, अजित पवार आणि पार्थ पवार एकत्र बसून एका मिनिटात हा विषय संपवतील. यात काहीही अडचण नाही,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

यावेळी राजेश टोपे यांनी विरोधकांकडून आघाडी सरकार पडणार असल्याच्या दाव्यावरही उत्तर दिलं. महाविकासआघाडी खूप चांगले चालले आहे. सगळेजण व्यवस्थित काम करत आहेत. हे सरकार 5 वर्षे चालणार आहे. विरोधकांनी केलेल्या दाव्यात काहीच तथ्य नाही, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.

“बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे द्या, कारवाई करु”

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारच्या काळात बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रश्न विचारला असता राजेश टोपे म्हणाले, “भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे द्यावे, त्यावर नक्कीच कारवाई होईल. तो तसा कायदा आहे.”

“कोरोनाच्या काळात सेवा न देणाऱ्या खासगी रुग्णालयांचे परवाने रद्द करु”

“खासगी दवाखाने जर कुणावर उपचार करत नसतील, त्यांच्यावर तर बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार कारवाई केली जाईल. यानुसार त्या रुग्णालयांचे परवाने रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. खासगी दवाखान्यांनी सेवा दिलीच पाहिजे,” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

पार्थ ‘सहयोग’ करणार? श्रीनिवास पवारांच्या घरी स्नेहभोजन, काका-काकी पार्थ पवारांची समजूत काढण्याची चिन्हं

पार्थच्या जिव्हारी लागलं असेल, पण तो संयमी, सर्वांचा सन्मान करतो, आत्याकडून कौतुक

मुख्यमंत्र्यांचं घरी बसून काळजीपूर्वक काम, आम्ही सर्व त्याचे साक्षीदार : राजेश टोपे

संबंधित व्हिडीओ :

Rajesh Tope on Sharad Pawar Parth Pawar issue

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.