Rajesh Tope : महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा बाहेर, राजेश टोपेंची सत्तार, भुमरेंवरती उघड नाराजी

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीतील घुसफूस अनेकदा बाहेर आली आहे. आता तर थेट मंत्री राजेश टोपे यांनी शिवसेना मंत्र्यांवर नाराजी दर्शवली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार फोडाफोडी करत असल्याचे वक्तव्य राजेश टोपे यांनी केले आहे.

Rajesh Tope : महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा बाहेर, राजेश टोपेंची सत्तार, भुमरेंवरती उघड नाराजी
राजेश टोपे शिवसेनेच्या मंत्र्यांवर नाराजImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 3:45 PM

मुंबई : गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घुसफूस अनेकदा बाहेर आली आहे. आता तर थेट मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शिवसेना मंत्र्यांवर नाराजी दर्शवली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) फोडाफोडी करत असल्याचे वक्तव्य राजेश टोपे यांनी केले आहे. शिवसेना मंत्र्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास होतोय या गोष्टीही खऱ्या आहेत, असे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या दोन मंत्र्यांकडे थेट बोट दाखवलं आहे. तसेच अब्दुल सत्तार यांना सांगणार की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सत्तेच्या बळावर फोडफोडी करू नये, आपण महाविकास आघाडी धर्म पाळावा, असेही ते म्हणाले आहेत. महाविकास आघाडीतला हा अंतर्गत सघर्ष बाहेर येण्याची ही पहिलीच वेळी नाही. याआधीही आघाडीतील कार्यकर्ते अनेकदा आमनेसामने आल्याचे दिसून आले आहे.

अनेकदा फोडाफोडी

राज्यात तीन दशकांपासून भाजप आणि शिवसेनेची युती होती. मात्र यावेळी पहिल्यांदाच महाविकास आघाडी सरकार तयार होत शिवसेना-राष्ट्रवादी-आणि काँग्रेस एकत्र सत्तेत बसली. आणि शंभरपेक्षा जास्त आमदार निवडूण येणारा भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्तेततून बाहेर राहिली. आता तीन पक्षाच्या या सरकारमध्ये कायमच सर्व काही अलबेल राहिलं नाही. अनेकदा राष्ट्रवादीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रवेश होतानाही आपण पाहिलं आहे. तर राष्ट्रवादीतील कार्यकर्तेही अनेकदा इतर पक्षात जाताना दिसून आले आहेत. त्यावेळी महाविकास आघाडीची धर्म पाळण्यावरून अनेकदा आघाडीतील नेत्यांनीच सवाल उपस्थित केले आहे.

आघाडीची डोकेदुखी आणखी वाढणार

तिन्ही पक्ष सरकारमध्ये जरी एकत्र असले तरी तिन्ही पक्ष स्थानिक लेव्हलला आपली ताकद वाढवण्याची आणि एकमेकांना शह देत स्थानिक पातळीवरील सत्ता काबीज करण्यासाठी अनेक वेगळे लढले आहे. तसेच महाविकास आघाडीतील पक्षांनी अनेक ठिकाणी थेट भाजपशी घरोबा करत नगरपंचायतींच्या निवडणुकीत सत्तेत बसणेही पसंत केले आहे. त्यामुळे हा संघर्ष जरी नवा नसला तरी राजेश टोपे यांच्यासारख्या बड्या नेत्याने उघड नाराजी वक्त केल्याने आता त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. या तिन्ही पक्षात समन्वय नसल्याची टीका भाजपकडून अनेकदा होत असते अशाच राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याची नाराजे समोर आल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा अंतर्गत वाद मिटवणे हे आता महाविकास आघाडीसमोरील मोठं आव्हाण असणार आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंना केंद्राची सुरक्षा? हालचाली सुरू; राज यांचे महत्त्व वाढवण्याचे प्रयत्न?

Pune Girish Mahajan : भाजपाकाळात एक दिवसही भारनियमन करावं लागलं नाही, वीजप्रश्नी गिरीष महाजनांची पुण्यात महाविकास आघाडीवर टीका

Jayshree Patil Viral Video : जयश्री पाटलांचा आणखी एक कारनामा, सवाल करणाऱ्या महिलेवरच हात उचलला

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.