प्रियांकांनी बिग बींनाही निवडणुकीत ओढलं, 30 वर्षांपूर्वीची खुन्नस अजूनही मनात?

नवी दिल्ली : या लोकसभा निवडणुकीत अनेक वादग्रस्त आणि अनावश्यक वक्तव्ये केली गेली. आता काँग्रेसच्या महासचिव यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांनाही निवडणुकीत ओढलंय. प्रियांका गांधी उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये होत्या. काँग्रेस उमेदवार ललितेशपती त्रिपाठी यांचा प्रचार करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत, मोदी हे अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा मोठे अभिनेते असल्याचं त्या म्हणाल्या. जगातील सर्वात […]

प्रियांकांनी बिग बींनाही निवडणुकीत ओढलं, 30 वर्षांपूर्वीची खुन्नस अजूनही मनात?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

नवी दिल्ली : या लोकसभा निवडणुकीत अनेक वादग्रस्त आणि अनावश्यक वक्तव्ये केली गेली. आता काँग्रेसच्या महासचिव यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांनाही निवडणुकीत ओढलंय. प्रियांका गांधी उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये होत्या. काँग्रेस उमेदवार ललितेशपती त्रिपाठी यांचा प्रचार करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत, मोदी हे अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा मोठे अभिनेते असल्याचं त्या म्हणाल्या. जगातील सर्वात मोठ्या अभिनेत्याला पंतप्रधान केलंय. त्याऐवजी अमिताभ बच्चन यांनाच पंतप्रधान करायचं होतं, असा टोला प्रियांकांनी लगावला.

भाजपचा हेतू कोणत्याही पद्धतीने सत्ता मिळवणं हाच आहे. मोदींनी गेल्या लोकसभा निवडणुकीत जी आश्वासनं दिली होती, त्यातलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही. काँग्रेस कधीही खोटी आश्वासने देत नाही. शेतकरी, तरुण आणि गरीबांसाठी आम्ही काम करतो, असं प्रियांका म्हणाल्या. हे समजा की तुम्ही जगातल्या सर्वात मोठ्या अभिनेत्याला पंतप्रधान केलंय. यापेक्षा चांगलं होतं की अमिताभ बच्चन यांनाच पंतप्रधान करायचं होतं. करणार तर कुणी काहीच नव्हतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

बिग बींना निवडणुकीत का ओढलं?

प्रियांका गांधींनी बिग बींना निवडणुकीत ओढलं आणि 30 वर्षांपूर्वीच्या वादाची चर्चा सुरु झाली. तो वाद प्रियांका अजूनही विसरु शकलेल्या नाहीत का, असाही तर्क लावण्यात आला. एकेकाळी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन हे अत्यंत मित्र होते. अमिताभ बच्चन गांधी कुटुंबासोबत आयएनएस विराट या युद्धनौकेवर फिरायला गेल्याचं ही बोललं जातं. एवढंच नाही, तर राजीव गांधींच्या लग्नापूर्वी जेव्हा सोनिया गांधी 13 जानेवारी 1968 रोजी भारतात आल्या होत्या, तेव्हा बिग बी त्यांना घेण्यासाठी विमानतळावर गेले होते.

I chowk च्या वृत्तानुसार, सोनिया गांधी आणि त्यांचे इटलीतील कुटुंबीय लग्नापूर्वी अमिताभ बच्चन यांच्याच घरी थांबल्याचं बोललं जातं. तेजी बच्चन यांनी सोनिया गांधींनी भारतीय संस्कृती आणि परंपरा याविषयी माहिती दिली होती. सोनिया गांधींचं कन्यादानही अमिताभ बच्चन यांचे वडील हरीवंश राय बच्चन आणि तेजी बच्चन यांनी केलं होतं.

काय आहे 30 वर्षांपूर्वीचा वाद?

70 आणि 80 च्या दशकात अमिताभ बच्चन लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यांची लोकप्रियता पाहता राजीव गांधींनी बिग बींना राजकारणात येण्याचा सल्ला दिला. 1984 मध्ये अमिताभ बच्चन यांनी काँग्रेसच्या तिकिटावर अलाहाबाद (प्रयागराज) मधून निवडणूक लढली आणि ते जिंकलेही. निवडणुकीनंतर बोफोर्स प्रकरण समोर आलं आणि भारतीय राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या, ज्यात अमिताभ बच्चन आणि त्यांचे भाऊ अजिताभ यांचंही नाव चर्चेत होतं.

याच प्रकरणानंतर राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांची मैत्री तुटल्याचं बोललं जातं. निवडणूक जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी तीन वर्षातच राजीनामा दिला आणि राजकारणालाही अलविदा केला. 1991 मध्ये जेव्हा राजीव गांधी यांची हत्या झाली, तेव्हाही अमिताभ बच्चन यांनी गांधी कुटुंबापासून अंतर ठेवणंच पसंत केल्याचं बोललं जातं. या कठीण प्रसंगातही बच्चन कुटुंबाने एकटं सोडल्याचं गांधी कुटुंबाचं म्हणणं होतं. तर याउलट बच्चन कुटुंबाचं म्हणणं होतं. राजकारणात आणून राजीव गांधींनी अर्ध्यावर सोडलं, असा बच्चन कुटुंबाचा तर्क होता.

याशिवाय अमिताभ बच्चन यांच्या एका मुलाखतीचाही दाखला दिला जातो. ज्यात ते म्हणाले होते, “या कुटुंबाने (गांधी आणि नेहरु) भारतावर पिढ्यानपिढ्या राज्य केलं. ते राजा आहेत आणि आपण जनता. राजाने ठरवावं लागतं की त्याला कुणासोबत संबंध ठेवायचे आहेत, कुणासोबत मैत्री करायची आहे. जनता नाही ठरवू शकत. आमचा आदर आणि स्नेह त्या कुटुंबासोबत नेहमी असेल, पण त्यांना ठरवावं लागेल की या जनतेसोबत त्यांना संबंध ठेवायचा आहे किंवा नाही.” अमिताभ बच्चन यांच्या याच मुलाखतीनंतर प्रियांका गांधींचा संताप झाल्याचंही बोललं जातं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.