Rajnish Seth on Raj Thackeray: मनसेच्या 13 हजार कार्यकर्त्यांना नोटिसा, तर कठोर कारवाई करण्यात येईल; पोलीस महासंचालकांचा इशारा
औरंगाबादच्या भाषणाचा अभ्यास केला आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी औरंगाबाद सीपी सक्षम आहे आणि ते कारवाई करतील. औरंगाबाद पोलिस आयुक्त गुन्हे कोणते लावायचे आणि कारवाई काय करायची याचा अभ्यास करीत आहे.
मुंबई – गृहमंत्र्यांनी आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यात महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) सक्षम आहेत. त्याचबरोबर समाजकंटक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई केली जाणार आहे. सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. एसआरपीएफ (SRPF) आणि होमगार्ड (homeguard) राज्यात तैनात करण्यात आलं आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवल्यास कारवाई करण्यात येईल. राज्यातील जनतेला आवाहन आहे की त्यांनी शांतता व सुव्यवस्था राखावी आणि पोलिसांना सहकार्य करावं असं पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी काही वेळापुर्वी मीडियाला सांगितलं.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात महाराष्ट्र पोलीस सक्षम
औरंगाबादच्या भाषणाचा अभ्यास केला आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी औरंगाबाद सीपी सक्षम आहे आणि ते कारवाई करतील. औरंगाबाद पोलिस आयुक्त गुन्हे कोणते लावायचे आणि कारवाई काय करायची याचा अभ्यास करीत आहे. कोणीही जातीय तेढ निर्माण केला तर आम्ही त्यावर कडक कारवाई करू. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. नोटीसा दिल्या आहेत. 87 एसआरपीएफ कंपनी 30 हजारावर होमगार्ड तैनात आहे. सर्व सीपींना सूचना देण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडू देणार नाही असं सुध्दा पोलिस आयुक्तांनी सांगितलं.
पोलीस महासंचालक रजनीश शेठ
आत्तापर्यंत महाराष्ट्र पोलिसांनी 15 हजार लोकांवर कारवाई केली आहे. 149 ची नोटीस 13 हजार लोकांना नोटीस देण्यात आली आहेत. तसेच पोलीसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कुणीही अनुचित प्रकार केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. राज ठाकरेंना नोटीशीबाबत औरंगाबाद पोलिस आयुक्तांना माहिती आहे. आजचं कारवाई होणार, त्याबाबत औरंगाबाद पोलिस आयुक्त निर्णय घेतील.