Raju Shetti : ऊस उत्पादकांमुळे शरद पवारांच्या पुतण्या आणि नातवांचे कारखाने झाले, राजू शेट्टी जोरदार टीका

ज्यांनी 800 शेतकऱ्यांचा बळी घेवून कृषी कायदे मागे घेतले. ज्यांच्यामुळे रासायनिक खतांच्या किमती वाढल्या, त्यांच्यासोबत कसं जाणार असंही राजू शेट्टी यांनी बोलून दाखवलं.

Raju Shetti : ऊस उत्पादकांमुळे शरद पवारांच्या पुतण्या आणि नातवांचे कारखाने झाले, राजू शेट्टी जोरदार टीका
ऊस उत्पादकांमुळे शरद पवारांच्या पुतण्या आणि नातवांचे कारखाने झाले, राजू शेट्टी जोरदार टीका Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 10:45 AM

बारामती – शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, ऊस गाळपा विना शिल्लक आहे. महापूरग्रस्तांना तोकडी मदत देण्यात आली आहे. एफआरपीचे (FRP) तुकडे करुन शेतकऱ्यांचं नुकसान केलं जात आहे. वीजेचा लपंडाव सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांचा आत्तापर्यंत बळी गेला.शिरोळमध्ये दुर्घटना घडली त्यामध्ये माझा वर्गमित्र सुहास याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) धोरणामुळे रासायनिक खतांचे दर वाढले आहे. इंधन दर वाढल्यामुळे मशागतीचा खर्च वाढला अशी टीका राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली. कोरोना काळात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. टनामागे 214 रुपये खर्च वाढला आहे, उसाचा दर परवडत नाही. रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेकांना महाविद्यालयीन शिक्षण सोडावं लागलं आहे. आरोग्य, म्हाडा पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान हे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. विरोधक ईडी, इनकम टॅक्स आणि भोंग्याच्या पुढे जायला तयार नाहीत. सत्ताधारी मशगुल आहेत. केंद्रातल्या अपयशावर विरोधक गप्प आहेत. तर राज्यातल्या प्रश्नावर इथले विरोधक गप्प आहेत. आळीमिळी गुपचिळी अशी अवस्था आहे.

महाविकास आघाडीने भूमीग्रहण कायद्यात मोडतोड केली

महाविकास आघाडीने भूमीग्रहण कायद्यात मोडतोड केली आहे. त्याबद्दल उत्तर द्यावं हे शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण आहे का ? एफआरपीचे तुकडे, वीजेचा लपंडाव, अतिवृष्टीतील तुटपुंजी मदत हे शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण आहे का ? ऊस हे एकमेव हमीभाव मिळणारं पिक आहे. असाच कायदा इतर पिकांना असता तर शेतकरी इतर पिकांकडे वळले असते. पवारसाहेब 10 वर्षे कृषीमंत्री होते. त्यांनी हा निर्णय घेतला असता तर आज परिस्थिती वेगळी असती. मात्र ते जाणीवपूर्वक असं बोलत आहेत.या ऊस उत्पादकांमुळेच त्यांच्या पुतण्या आणि नातवांचे कारखाने झाले अशी टीका राजू शेट्टीनी शरद पवार यांच्यावरती केली.

हे सुद्धा वाचा

कोणतीही कारवाई कायद्याने करावी त्याला धार्मिक रंग देऊ नये

ज्यांनी 800 शेतकऱ्यांचा बळी घेवून कृषी कायदे मागे घेतले. ज्यांच्यामुळे रासायनिक खतांच्या किमती वाढल्या, त्यांच्यासोबत कसं जाणार असंही राजू शेट्टी यांनी बोलून दाखवलं. कोणतीही कारवाई कायद्याने करावी त्याला धार्मिक रंग देऊ नये. 11 फेब्रूवारीला शरद पवार यांना पत्र लिहिलं होतं. विविध प्रश्न त्यात मांडले होते. सरकारच्या धोरणाबद्दल आक्षेप नोंदवला होता. सोनिया गांधी आणि राहुल गांधींनाही पत्र लिहिलं होतं. शेतकऱ्यांवर अन्यायकारक निर्णय घेतले आहेत. सर्वांकडून कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे कार्यकारिणीशी बोलून मी महाविकास आघाडीतून बाजूला व्हायचा निर्णय घेतला.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.