‘शिंदे सरकारचे मनापासून आभार’, राजकीय सलगी नेमकी कुणासोबत? राजू शेट्टींनी उघडपणे सांगितलं…

राजू शेट्टी नेमके कुणासोबत? वाचा...

'शिंदे सरकारचे मनापासून आभार', राजकीय सलगी नेमकी कुणासोबत? राजू शेट्टींनी उघडपणे सांगितलं...
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 1:00 PM

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी शिंदे -फडणवीस सरकारचे आभार मानलेत. एक रक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिंदे-फडणवीस (CM Eknath Shinde) सरकारचे मनापासून आभार, असं राजू शेट्टी म्हणालेत. तसंच त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकाही केलीय.

मागील महाविकास आघाडी सरकारने बेकायदेशीरपणे एफआरपीचे तुकडे केले. मागच्या सरकारमधील कारखानदार नेत्यांचा तो डाव होता. एक रक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचे मनापासून आभार मानतो, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

राजू शेट्टी नेमके कुणासोबत?

मागच्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना दिसत आहे. शिंदे सरकारचे आभार मानल्यानंतर आणि मविआवर टीका केल्यानंतर आता स्वाभिमानी आणि राजू शेट्टी नक्की कुणासोबत आहेत? असा प्रश्न चर्चित आहे. त्याचही उत्तर राजू शेट्टी यांनी दिलंय. आम्ही कुणासोबतही जाणार नाही, आम्ही स्वतंत्रपणे वाटचाल करत राहणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना दिलेत.

राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या विविध प्रश्नाबाबत राज्य सरकार सकारात्मक असून एक रक्कमी एफ. आर. पी चा कायदा राज्य सरकार पुर्ववत करून दोन टप्यातील एफ. आर. पी. चा कायदा रद्द करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत केली. त्याबरोबरच वजनकाटे ॲानलाईन करणे , वाहतूकदारांना महामंडळामार्फत मजूर पुरवठा करणे यासह केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाबाबत तातडीने पाठपुरावा करून शेतकरी हिताचे सर्व धोरण राबविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यांचे आभार, अशी फेसबुक पोस्ट राजू शेट्टी यांनी लिहिली आहे.

केंद्र सरकारने साखरेची किंमत 3500 रू क्विंटल करावी. तसेच इथेनॉलच्या खरेदीची किंमत प्रती लिटर 5 रूपयेने वाढवावा. केंद्र सरकारने ऊसदर नियंञण अध्यादेश 1966 मध्ये दुरूस्ती करून एफ आर पी ठरवण्याचे सुञ नव्याने तयार करावे.साखर कारखान्यांना नाबार्डकडून ५ टक्के व्याजदराने माल तारण कर्ज देण्यात यावे या बाबींवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती त्यांनी दिलीय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.