फडणवीस सरकारची जास्त लबाडी, ठाकरे सरकारने थोडी कमी, पण लबाडी केली : राजू शेट्टी
‘देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील अनेक घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढणार असल्याचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
नागपूर : ‘देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील अनेक घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढणार असल्याचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti on Fadnavis and Thackeray govt) यांनी दिला. फडणवीस सरकारमध्ये बांधकाम कामगार मंडळात मोठा घोटाळा झाला आहे. शिवाय आयटीमध्येही घोटाळा आहे, हे सर्व घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. (Raju Shetti on Fadnavis and Thackeray govt)
भाजप सत्तेत येऊ नये म्हणून आमचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. आमच्या एका आमदाराने काहीही फरक पडत नाही. शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास, आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारविरोधातही रस्त्यावर उतरु, असंही राजू शेट्टी म्हणाले.
राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी कर्जमाफीबाबत चुकीचा आकडा मांडला. त्यांनी याद्या जाहीर कराव्या. 31 हजार कोटींची बेरीज करुन दाखवावी. पूर्वीच्या सरकारनं जास्त लबाडी केली होती, या सरकारनं कर्जमाफीत थोडी कमी लबाडी केली, पण लबाडी केलीय, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला.
शेतकरी कर्जमाफीची घोषणा
ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी (22 डिसेंबर 2019) शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली होती. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं.
तर ‘या कर्जमाफीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंट देण्यात येतील. यासाठी कोणतीही ऑनलाईन नोंदी करावी लागणार नाही. हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. त्याशिवाय शेतकऱ्याला कुठेही हेलपाटे घालावे लागणार नाही. तसेच कोणीही रांगेत उभे राहा. हे करा, ते करा असे यावेळी होणार नाही’ असं अर्थमंत्री जयंत पाटील त्यावेळी म्हणाले होते. मार्च 2020 पासून महात्मा फुले कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सुरु होणार आहे.
संबंधित बातम्या
शेतकरी कर्जमाफीमध्ये ठाकरे सरकारची चलाखी, ‘हे’ शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभास अपात्र