ग्रामीण महाराष्ट्रात चक्का जाम करु, कृषीपंपासाठी दिवसा वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी राजू शेट्टींचा इशारा

| Updated on: Mar 02, 2022 | 9:15 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतीला दिवसा वीज मिळावी यासाठी आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.

ग्रामीण महाराष्ट्रात चक्का जाम करु, कृषीपंपासाठी दिवसा वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी राजू शेट्टींचा इशारा
राजू शेट्टी
Image Credit source: TV9
Follow us on

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतीला दिवसा वीज मिळावी यासाठी आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अद्याप घेतली नाही. राज्य सरकारनं यासंदर्भात अद्याप ठोस पावलं उचलेली नाहीत त्यामुळं 4 तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली होती. राज्य सरकारकडून चर्चेचं निमंत्रण आल्यास आंदोलन सुरु ठेवत चर्चा सुरु करणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं. राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज (Electricity for Agriculture) मिळावी म्हणून आंदोलन करत आहे. रात्रीच्या वेळी वीज मिळत असल्यानं शेतकऱ्यांना (Farmer) विविध अडचणींना सामोरं जावं लागतं. रात्रीच्या वेळी सर्पदंश आणि विंचू चावण्याचा धोका, यासह वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांना धोका असतो. त्यामुळं राजू शेट्टी यांनी शेतीला दिवसा वीज मिळावी म्हणून आंदोलन सुरु केलं आहे.

आंदोलन सुरु ठेवत चर्चा करणार

राजू शेट्टी यांनी सरकार कडून चर्चेचं निमंत्रण आल्यास आंदोलन चालू ठेऊन चर्चेला जाणार असल्याचं म्हटलं आहे. गेल्या 9 दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरण कंपनी ऑफिस समोर धरण आंदोलन सुरु आहे. राज्य सरकार आणि महावितरण या मागणीवर कोणता निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.

शेतीला दिवसा 10 तास वीज मिळावी

गेल्या 9 दिवसांपासून कोल्हापूरच्या महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. शेतीला दिवसा दहा तास वीज देण्याचा निर्णय झाला नाही तर 4 मार्च पासून आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. यापूर्वी दोन मंत्री , दोन आमदारांनी आंदोलनाला यांनी भेट दिली होती. मात्र, शासनस्तरावर कोणताही निर्णय झाला नाही. यापुढे मंत्री, आमदारांच्या सार्वजनिक कार्यक्रमात अडथळा आणणार असाही इशाराही राजू शेट्टी यांनी यापूर्वी दिला होता. ऊर्जा मंत्र्यांनी आंदोलनातील नुकसानीची जबाबदारी माझ्यावर टाकून बघावी, विजेच्या वाढीव दरांची जबाबदारी त्यांच्यावर टाकेन, असा टोला शेट्टी यांनी लगावला होता.

इतर बातम्या:

Russia Ukraine War : ऐकावं ते नवलच, इकडं उत्तर प्रदेशात गावची सरपंच तर यूक्रेनमध्ये एमबीबीएसची विद्यार्थीनी, यंत्रणाही गडबडली!

आणि इकडं येऊन त्यांची टर उडवायची हे बरे न्हवं, सोनाली कुलकर्णीच्या ण न वर किरण मानेंचा ‘डॅन्स’