राष्ट्रवादीने भाजपच्या मोहजाळात फसू नये, राजू शेट्टी यांचा सल्ला

राज्यात महासेनाआघाडीचे सरकार सत्तेत येण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे किमान समान कार्यक्रमावर अजून एकमत झालेलं नाही. असं असतानाच राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल, अशी जोरदार चर्चाही सुरु आहे

राष्ट्रवादीने भाजपच्या मोहजाळात फसू नये, राजू शेट्टी यांचा सल्ला
Follow us
| Updated on: Nov 18, 2019 | 8:02 PM

मुंबई : ‘राष्ट्रवादीने भाजपच्या मोहजाळात फसू नये, ते सर्वसामान्य जनतेला ते कदापि मान्य होणार नाही’, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ट्विटरवरुन दिला (Raju Shetti Advice to NCP). राजू शेट्टी यांनी पाच वाजताच्या सुमारास हे ट्वीट केलं. राज्यात महासेनाआघाडीचे सरकार सत्तेत येण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे किमान समान कार्यक्रमावर अजून एकमत झालेलं नाही. असं असतानाच राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल, अशी जोरदार चर्चाही सुरु आहे (Raju Shetti Tweet).

यासर्व परिस्थितीला पाहता राष्ट्रवादीने भाजप मोहजाळात फसू नये, असा सल्ला राजू शेट्टी यांनी दिला आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याच्या वेगवान हालचाली सुरु आहेत. किमान समान कार्यक्रमात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि विजमाफी दिल्यास स्वाभिमानी या आघाडीसोबत असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीने भाजपसोबत जाऊ नये, या आशयाचं ट्विट केलं. शेट्टीच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

अन्यथा भाजप आणि महासेनाआघाडीत काहीच फरक राहणार नाही : राजू शेट्टी

भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना महासेनाआघडी सोबत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ असं जाहीर केलं होतं. त्यानुसार, किमान समान कार्यक्रमात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अन्यथा भाजप आणि नव्याने होऊ घातलेल्या महासेनाआघाडीत काहीच फरक राहणार नाही, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी ‘टीव्ही-9 मराठी’सोबत बोलताना दिली.

शिवसेनेसोबत जाण्यास काही जण नाराज : शरद पवार 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar meet Sonia Gandhi) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधून चर्चेचा तपशील सांगितला. “आम्ही राज्यातील राजकारणाविषयी चर्चा केली. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबद्दल त्यांना माहिती दिली. इतर कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही नजर ठेवणार पुढे पावलं काय असणार हे ठरणार. या स्थितीबाबत त्यांचा विचार काय याबाबत चर्चा करणार. कोणासोबत सरकार बनवावं याबाबत कोणतीही चर्चा नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येण्यावर काही जण नाराज आहेत. राजकीय स्थितीबाबत चर्चा करताना युती झालेल्या पक्षांनाही सोबत घेतलं पाहिजे. कोणासोबतच जायचं की नाही याबाबतच चर्चा झाली नाही”, असं यावेळी शरद पवारांनी सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.