Raju Shetty : आधी आमदाराला बाहेरचा रस्ता, आता महाविकास आघाडीला रामराम! स्वाभिमानीत नेमकं काय घडतंय?

राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा अजूनही प्रलंबितच आहे आणि शेट्टींना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता राज्य सरकार करत नाही. या कारणांमुळे शेट्टी महाविकास आघाडीपासूनही दुरावले. आज अखेर शेट्टी यांनी महाविकास आघाडीलाही रामराम ठोकला आहे.

Raju Shetty : आधी आमदाराला बाहेरचा रस्ता, आता महाविकास आघाडीला रामराम! स्वाभिमानीत नेमकं काय घडतंय?
राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 7:13 PM

मुंबई : शरद जोशी यांच्यानंतर शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून लढा देणारी संघटना म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे (Swabhimani Shetkari Sanghatna) पाहिलं जातं. मात्र, शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत सहभागी झाली. पुढे भाजप आणि राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्यात बेबनाव तयार झाला. शेट्टी बाहेर पडले मात्र त्यांचा खंदा समर्थक सदाभाऊ खोत भाजपसोबतच राहिले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शेट्टी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारसोबत गेले. शेट्टींना आमदारकी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा अजूनही प्रलंबितच आहे आणि शेट्टींना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता राज्य सरकार करत नाही. या कारणांमुळे शेट्टी महाविकास आघाडीपासूनही दुरावले. आज अखेर शेट्टी यांनी महाविकास आघाडीलाही रामराम ठोकला आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केलीय.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारिणी बैठक आज कोल्हापुरात पार पडली. यावेळी शेट्टी यांनी आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. पूरग्रस्तांच्या निधीबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोठा विश्वासघात झालाय. महाराष्ट्रात यापूर्वी जसे साखर घोटाळे झाले तसे जलविद्युत केंद्रांबाबत होणार आहेत. असा विश्वासघात वारंवार होणार असेल तर या आघाडीसोबत राहायचा का असा प्रश्न आहे. मागे फिरायचं म्हटलं तर 800 शेतकऱ्यांचा बळी घेतला त्यांना पाठिंबा द्यायचा का? शेतकरी विरोधी भूमिका घेतल्या त्यांना मदत करायची का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय. त्याचबरोबर होय आम्ही राजकीय भूमिका बदलल्या पण त्यात शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडतील हा हेतू होता, असंही शेट्टी म्हणाले. शेट्टींनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा शेट्टी यांनी केलीय.

देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी

दरम्यान, दोन आठवड्यापूर्वी म्हणजे 24 मार्च रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तशी घोषणा राजू शेट्टी यांनी अमरावतीमधून केली होती. देवेंद्र भुयारबद्दल अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. तुम्ही शेतकऱ्यांचा घात केला असेल तर अशी घाण आमच्या संघटनेत राहू शकत नाही, असा घणाघात शेट्टी यांनी केला. आजपासून देवेंद्र भुयारचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध नाही. त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी घोषणा शेट्टी यांनी केली. इतकंच नाही तर राजू शेट्टी यांनी भुयार यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात हल्ला चढवला होता.

भुयार यांच्या हकालपट्टीची घोषणा करताना राजू शेट्टी भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. शेट्टी यांचे डोळे पाणावले होते. देवेंद्र भुयारबद्दल माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. तुम्ही शेतकऱ्यांचा घात केला असेल तर असली घाण आमच्या संघटनेत राहू शकत नाही. त्याला संधी द्यायची का? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारला. मी माझ्या कष्टाचा पैसा एका चोराला दिला याचं दु:ख वाटतं. मी माझं घर विकलेले पैसे या हरामखोराला दिले. अजित पवार यांचे फोटो देवेंद्र भुयारच्या बॅनरवर दिले. देवेंद्रसाठी मी जेव्हा अजित पवार यांना तिकीट मागत होतो तेव्हा अजित पवार म्हणाले की फडतूस माणसासाठी तुम्ही जागा मागत आहात. विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मी याला संधी दिली. मी तुमची माफी मागतो, असं शेट्टी त्यावेळी म्हणाले होते.

रविकांत तुपकरांचाही रामराम आणि घरवापसी

राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक रविकांत तुपकर यांनीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकला होता. मात्र, अवघ्या 20 दिवसांतच त्यांनी घरवापसी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुपकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, एकेकाळचे सहकारी आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्याशी त्यांनी संधान बांधलं होतं. मात्र, अवघ्या 20 दिवसातच तुपकर यांनी पुन्हा एकदा स्वाभिमानीचा झेंडा हाती घेतला.

इतर बातम्या : 

Raju Shetty : राजू शेट्टींचा अखेर महाविकास आघाडीला रामराम! शेतकऱ्यांसाठी पुन्हा रस्त्यावरची लढाई, महाराष्ट्र पिंजून काढणार

Raju Shetty : राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? फैसला आजच, बळीराजासाठी ‘हुंकार’ भरला

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.