‘साखरेला चांगले दिवस, ऊसाला 3700 रुपये भाव द्या’, राजू शेट्टींची नाशिकमधून मागणी; एसटी कर्मचाऱ्यांनाही महत्वाचा सल्ला

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष परिषद घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केलीय. द्राक्ष उत्पादकांची चिंता मिटवू. सरकारनं कारवाई केली नाही तर कायदा हातात घेऊ. शेतकरी आंदोलनाची आम्ही प्रेरणा घेतली. त्यांना आधार देण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ताकद नाशिकच्या शेतकऱ्यांच्या मागे लावू, असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिलाय.

'साखरेला चांगले दिवस, ऊसाला 3700 रुपये भाव द्या', राजू शेट्टींची नाशिकमधून मागणी; एसटी कर्मचाऱ्यांनाही महत्वाचा सल्ला
राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 4:35 PM

नाशिक : ऊसाला टनाला 3700 रुपये भाव देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatna) अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केलीय. ते आज नाशिक (Nashik) मध्ये बोलत होते. नाशिकमध्ये उत्पादन खर्चापेक्षा ऊस कमी किमतीत मिळतो. सांगली, कोल्हापूर, सातारा यापेक्षा नगरची स्थिती वेगळी नाही. मात्र, टनामागे पंधराशे रुपयांचा फरक पडतो, असं शेट्टी म्हणाले. तसंच भ्रष्टाचाराचा आरोप झालेले कारखाने चौकशी करुन सुरु करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Raju Shetty demands Rs 3,700 per tonne for sugarcane in Nashik)

साखरेचा क्विंटलमागे 400 ते 500 रुपये भाव वाढला आहे. इथेनॉलचे भाव वाढले आहेत. साखरेला चांगले दिवस आले, मात्र नाशिकच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा घेता येत नाही. द्राक्ष पिकांचंही अवकाळीनं नुकसान झालं. आता छाटणी कधी करायची असा प्रश्न बागायतदारांसमोर आहे. छाटणी केली तरी पाऊस पडतो, नाही केली तरी पडतो. बाहेरचे व्यापारी गायब होण्याच्या घटनाही घडतात. अशा व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी काही तरतूद नाही. त्यामुळे परवानाधारक व्यापाऱ्यांनाच खरेदी करायला परवानगी देण्याची मागणीही शेट्टी यांनी केलीय. तसंच नाशिक जिल्ह्यात द्राक्ष परिषद घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केलीय. द्राक्ष उत्पादकांची चिंता मिटवू. सरकारनं कारवाई केली नाही तर कायदा हातात घेऊ. शेतकरी आंदोलनाची आम्ही प्रेरणा घेतली. त्यांना आधार देण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ताकद नाशिकच्या शेतकऱ्यांच्या मागे लावू, असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिलाय.

भाजपमध्ये आल्यावर चौकशी होत नाही, शेट्टींचा टोला

साखर कारखान्यांमध्ये गैरव्यवहार होत असेल तर कारवाई झाली पाहिजे. काही कारखान्यांची चौकशी होते. पण भाजपमध्ये आले त्यांची चौकशी होत नाही. जे भाजपमध्ये येत नाहीत त्यांची मात्र चौकशी होती, अशा शब्दात शेट्टी यांनी भाजपवरही निशाणा साधलाय.

‘..अन्यथा ज्याला पाठीवर स्वार केलं त्याला वाघ खाऊन टाकतो’

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सहळ्यांची सहानुभूती आहे. वास्तव आणि व्यवहार याचा विचार करायला हवा. विद्यार्थ्यांचा विचार करुन, इशारा देऊन संपाबाबत पुनर्विचार करावा लागेल. इतका चांगला संप यशस्वी झाला पाहिजे ही माझी इच्छा आहे. काही उथळ लोक यात घुसले आहेत. शेतकरी चळवळ आणि एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन वेगळे आहे. वाघावर स्वार होऊन पायउतार होणं अवघड आहे. अन्यथा ज्याला पाठीवर स्वार केलं त्याला वाघ खाऊन टाकतो, असा महत्वाचा सल्लाही शेट्टी यांनी दिलाय.

इतर बातम्या :

‘गळफास घेण्याचा प्रयत्न हा स्टंट नव्हता’, महावितरणच्या वीज तोडणी विरोधात बाळासाहेब मुरकुटे पुन्हा आक्रमक

‘भाजपनं गैरवाजवी मागण्या घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचं काम केलं’, नवाब मलिकांचा आरोप

Raju Shetty demands Rs 3,700 per tonne for sugarcane in Nashik

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.