महावितरणने अतिरेक केल्यास जशास तसं उत्तर देणार, उर्जामंत्री नितीन राऊतांना राजू शेट्टींचं उत्तर
शेतकऱ्यांना वीज बिल (Electricity Bill) भरावंच लागेच. फार तर त्यांनी वीज बिल भरण्याची सवलत देऊ शकतो आणि ती दिलेली आहे. भाजपनं सवय लावून ठेवलीय. महावितरणवर 56 हजार कोटीचा बोजा आलाय तो भरायचा कुठून? असा सवाल नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केलाय. राऊतांच्या या वक्तव्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीका करत ऊर्जामंत्र्यांना इशारा दिलाय.
कोल्हापूर : थकित वीज बिलामुळे कृषी पंपाचं वीज कनेक्शन कापण्याची मोहिम महावितरणने (MSEDCL) हाती घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. तर भाजपकडूनही राज्यभरात महावितरणच्या या मोहिमेविरोधात आंदोलनं करण्यात येत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांना वीज बिल (Electricity Bill) भरावंच लागेच. फार तर त्यांनी वीज बिल भरण्याची सवलत देऊ शकतो आणि ती दिलेली आहे. भाजपनं सवय लावून ठेवलीय. महावितरणवर 56 हजार कोटीचा बोजा आलाय तो भरायचा कुठून? असा सवाल नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केलाय. राऊतांच्या या वक्तव्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीका करत ऊर्जामंत्र्यांना इशारा दिलाय.
महावितरणने अतिरेक केल्यास जशास तसं उत्तर देऊ, असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिलाय. सदोष वीज बिल दुरुस्त करा, बिलांवरील दंड व्याज माफ करा. शेतकरी बिल भरण्यास तयार आहे. शेतकरी काही फुकटा नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे. कोरोना आणि अतीवृष्टीच्या संकटामुळे महाविकास आघाडी सरकारला जास्त काम करता आलं नाही. मात्र, सरकारनं पूरग्रस्तांची निराशा केली. ज्यादा नुकसान भरपाईसाठी मी आजही आग्रही आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यात केंद्र आणि राज्य सरकार दोघेही कमी पडले, अशी टीका शेट्टी यांनी केलीय.
नितीन राऊत नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांना वीज बिल भरावंच लागेच. फार तर त्यांनी वीज बिल भरण्याची सवलत देऊ शकतो आणि ती दिलेली आहे. भाजपनं सवय लावून ठेवलीय. महावितरणवर 56 हजार कोटीचा बोजा आलाय तो भरायचा कुठून? असा सवाल नितीन राऊत यांनी भाजप नेत्यांना केलाय. दुसरीकडे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरुनही नितीन राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधलाय. केंद्र सरकारचे दिल्लीतील नेते कशी टीका करतात हेच समजत नाही. केंद्र सरकारनं इंधनाचे दर कमी करण्याचे प्रयत्न केले नाहीत. क्रूड ऑईलचे दर कमी असताना त्यांच्याकडून कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केंद्राकडून केलं जात आहे, अशी टीका राऊत यांनी केलीय.
56 हजार कोटींचा बोजा आलाय, तो भरायचा कसा?
वीज फुकटात कधीपासून मिळायला लागली? कोळसा, पाणी यापासून वीज निर्मिती होते त्याला पैसे मोजावे लागतात. वीज वापरतात मग वीज बिल भरायला का नको वाटतं? मुंबई अंधारात बुडाली तेव्हाही आम्ही तत्काळ वीज पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. भाजपने शेतकऱ्यांना सवय लावून ठेवली आहे. अडचण निर्माण केली आहे. 56 हजार कोटींचा बोजा आलाय, तो भरायचा कसा? असंही राऊत यावेळी म्हणाले.
इतर बातम्या :