Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर, कारण काय, किती वेळात लागणार निकाल?

5 वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, अद्याप मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. त्याला भाजप आणि महाविकास आघाडीकडून घेण्यात आलेल्या आक्षेपांमुळे मतमोजणीला उशीर होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर, कारण काय, किती वेळात लागणार निकाल?
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 5:58 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीचं (Rajya Sabha Election) मतदान आज पार पडलं. राज्यातील 6 जागांसाठी एकूण 7 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळालं. मतदान पूर्ण झालं असलं तरी मतमोजणीला विलंब झाल्याचं पाहायला मिळत आहे. 5 वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, अद्याप मतमोजणीला (Counting) सुरुवात झालेली नाही. त्याला भाजप आणि महाविकास आघाडीकडून घेण्यात आलेल्या आक्षेपांमुळे मतमोजणीला उशीर होत असल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या आक्षेपांवर निर्णय घेईल आणि त्यानंतरच मतमोजणी होईल, असं सांगण्यात येत आहे.

कधी लागणार निकाल?

मतदानानंतर संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. मात्र, भाजपकडून दोन तर महाविकास आघाडीकडून एक आक्षेप नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने या आक्षेपावर निर्णय दिल्यानंतरच मतमोजणीची प्रक्रिया सुरु होईल असं सांगण्यात येत आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर साधारण सव्वा तासात निकास स्पष्ट होईल, असंही सांगण्यात येत आहे. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निर्णय आल्याशिवाय मतमोजणीला सुरुवात होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

आक्षेपाचं राजकारण

जितेंद्र आव्हाड यांनी जयत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली. तर यशोमती ठाकूर यांनी मतपत्रिका एजंटला दाखवली. त्यांमुळे ही दोन्ही मतं बाद करावीत अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, पिठासीन अधिकाऱ्यांनी भाजपची ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आधीच घोडेबाजाराचे आरोप होत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक जेलमध्ये आहेत. त्यांना मतदानाला परवानगी देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे एका एका मतासाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं आज पाहायला मिळालं. त्यानंतर काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका बावनकुळे आणि शेलारांकडे दिल्याचा आरोप अमर राजूरकर यांनी केलाय.

हे सुद्धा वाचा

गुलाल उधळणार का? मुख्यमंत्री म्हणतात, ऑफकोर्स…

मुख्यमंत्री मतदानावेळी विधान भवनात ठाण मांडून होते. दुपारी साडे तीनच्या सुमारास मुख्यमंत्री विधान भवनातून निघाले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना एक पार्टी नक्की म्हणायची का? असा प्रश्न केला. तेव्हा मला घरी जाऊन येऊ द्या. संध्याकाळी येतोच असं उत्तर त्यांनी दिलं. तर एका पत्रकाराने विजयाचा गुलाल उधळणार का? असं विचारलं असता ऑफकोर्स असं उत्स्फुर्त उत्तर त्यांनी दिलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.