Rajya Sabha Election 2022 : राजस्थानमध्ये भाजपच्या आमदाराचं काँग्रेसला मत तर कर्नाटकतही क्रॉस व्होटींग, महाराष्ट्रातही तक्रार, चार राज्यात नेमकं काय घडतंय?
राजस्थानात व्होटींगशी संबंधित वाद सुरू आहे. भाजपच्या शोबारानी यांनी काँग्रेसला व्होट दिल्याची माहिती आहे. कर्नाटकातही क्रॉस व्होटींग झाली. राजस्थानात भाजपच्या शोभारानी यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना व्होट दिलंय.
मुंबई : चार राज्यातल्या 16 जागांसाठी व्होटींग (Voting) सुरू आहे. यात महाराष्ट्रातील 6, राजस्थानात 4, हरियाणात 2 आणि कर्नाटकात 4 जागांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी राजस्थान बसपामधून काँग्रेसमध्ये आलेल्या 6 आमदारांनी (MLA) मतदान केले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यानंतर 6 आमदारांनी मतदान केले. राजस्थानात व्होटींगशी संबंधित वाद सुरू आहे. भाजपच्या शोबारानी यांनी काँग्रेसला (Congress) व्होट दिल्याची माहिती आहे. कर्नाटकातही क्रॉस व्होटींग झाली. राजस्थानात भाजपच्या शोभारानी यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना व्होट दिलंय. कर्नाटकात श्रीनिवास गौडा म्हणाले, मी काँग्रेसला व्होट दिलं. कारण मला तो पक्ष पसंत आहे. हरियाणात काँग्रेसचे 2 व्होट रद्द झाले. किरण चौधरी आणि बीबी बत्रा यांनी दुसऱ्यांनाच मतदान केलं. हरियाणात अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याचं सांगितलं. त्यामुळं काँग्रेसच्या माकन यांचा विजय कठीण झाला. कर्नाटकात जद (एस) व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मोठा दावा केला. ते म्हणाले, जिंकण्यासाठी भाजप काँग्रेसला मदत मागत होते. सी. टी. रवी हे भाजपचे महासचिव आहेत. मग ते काँग्रेसच्या कार्यालयात कसे गेले? सी. टी. रवी हे सिद्धरमय्या यांच्याकडं सहकार्य मागण्यासाठी गेले होते.
मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल
महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत 12.25 मिनिटांपर्यंत 138 आमदारांनी मतदान केले. कैदेतील नवाब मलिक यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला नाही. त्यामुळं मलिक यांना मतदान करता येणार नाही. पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांना अॅम्बुलन्सनं विधानभवनात आणण्यात आलं. महाराष्ट्रात भाजपला हरविण्यासाठी ओवैसीयांचा पक्ष AIMIM ने काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला. परंतु, याचा फायदा शिवसेनेला होईल. राज ठाकरे यांच्या मनसेने शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. शिवसेनेने ओवैसींचे समर्थन घेतल्याचा आरोप मनसेनं केलाय. यातून शिवसेनेचं हिंदुत्व कसं फसवं आहे, हे दिसून येत असल्याचं ते म्हणाले. शिवसेना निजामांच्या वंशजांचंही समर्थन घेण्यास मागेपुढं पाहणार नाही, असा आरोप मनसेनं केलाय.
धनंजय महाडीक की, संजय पवार निवडून येणार
शिवसेनेचे संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होणार असल्याचा दावा केलाय. आमच्याकडं पुरेसं समर्थन असल्याचं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होत आहे. पण, फक्त एका जागेसाठी टक्कर आहे. राज्यसभा निवडणुकीच्या प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी एकूण 42 मतांची आवश्यकता आहे. भाजपजवळ 106 आमदार आहेत. याच्या भरोशावर त्यांचे दोन उमेदवार निवडून येतील. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येईल. याव्यतिरिक्त महाविकास आघाडी आणि भाजपकडं काही अतिरिक्त मतं उरतील. परंतु, सहावा उमेदवार सहज निवडून येईल, अशी परिस्थिती नाही. महाविकास आघाडीचे अतिरिक्त मतं हे कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना मिळतील. तसेच कोल्हापूरचे भाजपचे उमेदवार धनंजय महाडीक यांना तिसरा उमेदवार बनविले आहे. महाडीक यांच्याकडं 7 अपक्ष आमदारही आहेत. भाजपचे दोन्ही उमेदवार जिंकल्यानंतर 29 मतं उरतील. महाडीक यांच्याकडं 36 मतं (अपक्षांना मिळून) आहेत. पण, जिंकण्यासाठी त्यांना 6 मतांची गरज आहे. महाविकास आघाडीही 41 मतं मिळविण्याचा दावा करत आहेत. त्यामुळं संजय पवार आणि धनंजय महाडीक यांच्यात खरी टक्कर आहे.