Rajya Sabha Election 2022 : दोन्ही बाजूला गुलाल तयार, पण उधळणार कोण? रोहित पवार आणि सदाभाऊ खोतांपैकी कुणाचा दावा खरा ठरणार?

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) मतदान सुरु आहे. 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे यंदाच्या राज्यसभा निवडणुकीचा फड अधिक रंगलेला पाहायला मिळाला. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते आणि भाजप नेत्यांकडूनही विजयाचा दावा केला जातोय. त्यातच मतदानावेळीही राजकारण पाहायला मिळालं. दोन्ही बाजूंनी काही आमदारांच्या मतांवर आक्षेप नोंदवण्यात आला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार […]

Rajya Sabha Election 2022 : दोन्ही बाजूला गुलाल तयार, पण उधळणार कोण? रोहित पवार आणि सदाभाऊ खोतांपैकी कुणाचा दावा खरा ठरणार?
सदाभाऊ खोत, रोहित पवारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 5:22 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) मतदान सुरु आहे. 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे यंदाच्या राज्यसभा निवडणुकीचा फड अधिक रंगलेला पाहायला मिळाला. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते आणि भाजप नेत्यांकडूनही विजयाचा दावा केला जातोय. त्यातच मतदानावेळीही राजकारण पाहायला मिळालं. दोन्ही बाजूंनी काही आमदारांच्या मतांवर आक्षेप नोंदवण्यात आला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विजयाचा दावा केलाय. तर भाजपचे सहकारी सदाभाऊ खोत यांनी धनंजय महाडिक यांचा विजय निश्चित असल्याचं म्हटलंय. इतकंच नाही तर दोन्ही बाजूला गुलाल तयार आहे. पण उधळणार कोण? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे.

कार्यकर्त्यांनी गुलाल तयार ठेवलाय – रोहित पवार

रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना कार्यकर्त्यांनी गुलाल तयार ठेवलाय. मी आता तिकडेच निघालो आहे. आमदार उमेदवार विजयी होतील. आमचा आमच्या आमदारांवर विश्वास आहे. अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. आमच्या विजय निश्चित पाहायला मिळेल. भाजप कशाच्या जोरावर विजयाचा दावा करत आहे माहिती नाही. आमचेच उमेदवार विजयी होतील, असं रोहित पवार म्हणाले. तर नवाब मलिकांवरचा आरोप सिद्ध झालेला नाही. त्यांना मताचा अधिकार मिळेल असं वाटलं मात्र तसं झालं नाही. आमचा न्यायपालिकेकडून अपेक्षा होती, असंही रोहित पवार म्हणाले.

महाडिकांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच विजय निश्चित – खोत

दुसरीकडे रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत हे दुपारी भाजप कार्यालयात पोहोचले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तीन खासदारांना दिल्लीत पाठवून चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाचं गिफ्ट देणार. सेना हरणार आणि भाजप जिंकणार. कितीही आदळआपट करा, विजय आमचाच, असा दावा खोत यांनी केलाय. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विजय निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलंय. फक्त तो किती मतांनी ते लवकरच कळेल, असा दावाही त्यांनी केलाय. ज्या दिवशी धनंजय महाडिक यांचा अर्ज भरला त्याच दिवशी आम्ही गुलाल तयार ठेवला, असंही खोत म्हणाले. तर नवाब मलिक यांच्याबाबत कोर्टाचा निर्णय अंतिम असल्याचंही खोत यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आक्षेपांचं राजकारण

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्यावेळी भाजपकडून महाविकास आघाडीच्या दोन आमदारांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आला. भाजप आमदार पराग अळवणी यांनी जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतावर आक्षेप घेतला. तर काँग्रेसच्या अमर राजूरकर यांच्याकडून भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....