Rajya Sabha Election 2022 : धनंजय महाडिक आणि संजय पवार यांच्या कुटुंबियांनाही विजयाचा विश्वास, कोल्हापूरच्या आखाड्यातील कोणता मल्ल बाजी मारणार?

भाजपकडून कोल्हापूरच्याच धनंजय महाडिकांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे कोल्हापूरच्या आखाड्यातील कोणता मल्ल बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, धनंजय महाडिक आणि संजय पवार या दोन्ही उमेदवाराच्या कुटुंबियांनी विजयाचा दावा केलाय.

Rajya Sabha Election 2022 : धनंजय महाडिक आणि संजय पवार यांच्या कुटुंबियांनाही विजयाचा विश्वास, कोल्हापूरच्या आखाड्यातील कोणता मल्ल बाजी मारणार?
धनंजय महाडिक आणि संजय पवारांच्या कुटुंबियांना विजयाचा विश्वासImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 9:05 PM

कोल्हापूर : राज्यात राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election) रणधुमाळी सुरु आहे. राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अधिक रंगत पाहायला मिळतेय. सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं कोल्हापूरच्या संजय पवार (Sanjay Pawar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर भाजपकडून कोल्हापूरच्याच धनंजय महाडिकांना (Dhananjay Mahadik) उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे कोल्हापूरच्या आखाड्यातील कोणता मल्ल बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, धनंजय महाडिक आणि संजय पवार या दोन्ही उमेदवाराच्या कुटुंबियांनी विजयाचा दावा केलाय.

‘कधी निकाल लागेल आणि आम्ही उत्सव साजरा करु असं वाटत आहे’

संजय पवार यांच्या पत्नी आणि मुलीने विजयाचा दावा केलाय. ‘आम्ही निकालाची वाट पाहतोय. कधी निकाल लागेल आणि आम्ही उत्सव साजरा करु असं आम्हाला वाटत आहे. संजय पवार यांचा विजय नक्की होईल असं आम्हाला वाटतं’, अशी प्रतिक्रिया संजय पवार यांच्या पत्तीने दिलीय. तर ‘आम्ही पप्पांचा संघर्ष मागच्या 30 वर्षापासून पाहत आलोय. आम्हाला आनंद आहे, धाकधुकही आहे. पण आम्हाला विश्वास वाटतो की संजय पवार खासदार म्हणून निवडून येतील. त्यांच्या कष्टाचं फळ मिळू दे अशी प्रार्थना देवाकडे करतो आहोत. निकालाची आतुरतेने वाट पाहतोय’, असं संजय पवार यांच्या मुलीने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

‘पक्षीय पातळीवरील प्रयत्न आणि गाठीभेठींमुळे विजयाची अपेक्षा’

तर दुसरीकडे भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. पक्षीय पातळीवर केलेले प्रयत्न आणि वैयक्तिक गाठीभेठींमुळे विजयाची अपेक्षा आहे, असं शौमिका महाडिक म्हणाल्या. तसंच धनंजय महाडिक आणि शरद पवार यांच्या वैयक्तिक संबंधाचा फायदा होईल का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सूचक वक्तव्य केलंय. तसा काही फायदा झाला तर आनंदच आहे, असं शौमिका महाडिक म्हणाल्या.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.