धनंजय महाडिक लक्ष्मण जगतापांच्या भेटीला, तर अनिल बोंडेंनी घेतली मुक्ता टिळकांची भेट; भाजपच्या विजयाचं श्रेय याच लढवय्या आमदारांना

या विजयाचं श्रेयही फडणवीस यांना या लढवय्या आमदारांनाच दिलं आहे. त्यानंतर आज नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक आमदार लक्ष्मण जगतापांच्या भेटीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये गेले. तर खासदार डॉ. अनिल बोंडे आमदार मुक्ता टिळकांच्या भेटीला पोहोचले.

धनंजय महाडिक लक्ष्मण जगतापांच्या भेटीला, तर अनिल बोंडेंनी घेतली मुक्ता टिळकांची भेट; भाजपच्या विजयाचं श्रेय याच लढवय्या आमदारांना
लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 11:45 PM

पुणे : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का दिलाय. राज्यसभेच्या सहा जागांपैकी महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) तीन तर भाजपनं तीन जागांवर विजय मिळवलाय. खऱ्या अर्थानं सहाव्या जागेवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. त्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी आखलेली रणनिती यशस्वी ठरली. फडणवीसांनी एक एका मताची जुळणी केली. आजारी असलेले पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि पुण्यातील कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक यांनाही फडणीसांनी विधान भवनात मतदानासाठी आणलं. तसंच या विजयाचं श्रेयही फडणवीस यांना या लढवय्या आमदारांनाच दिलं आहे. त्यानंतर आज नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक आमदार लक्ष्मण जगतापांच्या भेटीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये गेले. तर खासदार डॉ. अनिल बोंडे आमदार मुक्ता टिळकांच्या भेटीला पोहोचले.

‘बहीण भावामध्ये जी चर्चा होते ती चर्चा आम्ही केली’

आमदार मुक्ता टिळक यांची भेट घेत अनिल बोंडे यांनी त्यांचे आभार मानले. तसंच त्यांच्याशी मनसोक्त गप्पाही मारल्या. मुक्ता टिळक यांची भेट घेतल्यानंतर बोंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुक्ताताई यांना भेटून आनंद झाला. स्वत:ची तब्येत ठीक नसताना त्यांनी आमच्या राज्यसभा निवडणुकीत योगदान दिलं. म्हणूनच आमच्या विजयाचं श्रेय मुक्ताताई टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना आम्ही दिलंय. आमचे लोकप्रतिनिधी अशी कर्तव्याची जाण ठेवतात. मी भेटून त्यांचे आभार मानले. बहीण भावामध्ये जी चर्चा होते ती चर्चा आम्ही केली. ताई लवकर बऱ्या व्हाव्या आणि त्यांनी समाजकारणात पुन्हा सक्रिय व्हावं अशी देवाकडे प्रार्थना करतो, असं बोंडे यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘भाऊंच्या धैर्यामुळं, धाडसामुळंच मी खासदार होऊ शकलो’

तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. यावेळी यावेळी महाडिक यांनी जगताप यांचे आभार मानले. तसंच त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थनाही केली. भाजपचा विजय देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण भाऊ जगताप आणि मुक्ताताई टिळक यांना समर्पित केलाय. त्याचं कारणही तसं आहे, आपण पाहिलं असेल की भाऊंची तब्येत अनेक दिवस ठीक नव्हती. अनेक दिवस ते रुग्णालयात दाखल होते, आयसीयूमध्ये होते. आज मला हे सांगायचं आहे की भाऊंच्या धैर्यामुळं, धाडसामुळंच काल मी खासदार होऊ शकलो. याचा मला खूप अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. त्यानंतर महाडिक यांनी गॅलेक्सी रुग्णालयात जाऊन मुक्ता टिळक यांचीही भेट घेतली.

फडणवीसांकडून राज्यसभेतील विजय लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळकांना समर्पित

राज्यसभेतील मोठ्या विजयानंतर फडणवीस शनिवारी पहाटे म्हणाले की, आमच्या सगळ्यांसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. आमचे तिनही उमेदवार निवडून आले आहेत. हा विजय आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करतो. लक्ष्मणभाऊ रुग्णावाहिकेत प्रवास करुन इथपर्यंत आले. मी काल लक्ष्मण जगताप यांच्या भावाशी बोलतो की आमची एक जागा गेली तरी चालेल पण आम्हाला लक्ष्मणभाऊ महत्वाचे आहेत. पण लक्ष्मणभाऊ म्हणाले की वाटेल ते झालं तरी माझ्या पक्षासाठी मी येणारच. आमच्या मुक्ताताई टिळकही अत्यंत विपरित परिस्थितीत मतदानासाठी आल्या होत्या. त्यांचे मी आभार मानतो.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.