‘अब पुरी कायनात देवेंद्रजी के साथ है’, मिसेस फडणवीसांकडून कौतुकाचा वर्षाव; तर एका हुरळून जाऊ नका, किशोरी पेडणेकरांचा इशारा

फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही पतीवर कौतुकाचा वर्षाव केलाय. 'अब देवेंद्रजी अकेले नहीं, पुरी कायनात उनके साथ है', असं अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांना सूचक इशारा दिलाय.

'अब पुरी कायनात देवेंद्रजी के साथ है', मिसेस फडणवीसांकडून कौतुकाचा वर्षाव; तर एका हुरळून जाऊ नका, किशोरी पेडणेकरांचा इशारा
किशोरी पेडणेकर, अमृता फडणवीसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 10:01 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत भाजपनं सहाव्या जागेवर जोरदार विजय मिळवलाय. सहा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते. सहाव्या जागेसाठी मोठी चुरस पाहायला मिळत होती. मात्र, भाजपच्या धनंजय महाडिकांनी (Dhananjay Mahadik) शिवसेनेच्या संजय पवारांना पराभवाची धूळ चाखायला लावली. हा धक्का खासकरुन खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आहे. कारण त्यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. दरम्यान हा विजय देवेंद्र फडणवीस यांच्या रणनितीचा असल्याचं भाजप नेते सांगत आहेत. फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही पतीवर कौतुकाचा वर्षाव केलाय. ‘अब देवेंद्रजी अकेले नहीं, पुरी कायनात उनके साथ है’, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांना सूचक इशारा दिलाय.

‘घोडेबाजाराच्या विजयानंतर इतकं हुरळून जाऊ नका’

कालची निवडणूक ही जनतेची नव्हती. या निवडणुकीत घोडेबाजार झाला हे नक्की आहे. मुख्यमंत्री कधीही जनतेचे राजे नसतात, ते जनतेचे सेवक असतात. राजा बिजा तुमच्या घरी ठेवा. मुख्यमंत्री जनतेचं काम करत आहेत. ते जनतेला ठरवू द्या, तुम्ही ठरवू नका. सतत बोलून चर्चेत राहण्याची सवय काही लोकांना आहे. राज्यसभेच्या एका निवडणुकीने हुरळून जाऊ नका. कोण काफी आहे, कोण भारी आहे हे कळेल. दुसऱ्याच्या कामाचं परिमार्जन तुम्ही नाही करु शकत. विकास कोण करत आहे हे गेली अडीच वर्षे लोकांना माहिती आहे. आकडेवारीच्या आणि घोडेबाजाराच्या विजयानंतर इतकं हुरळून जाऊ नका, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांना लगावलाय.

हे सुद्धा वाचा

अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

अमृता फडणवीस यांनी भाजपच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. ‘अब देवेंद्र अकेला नही है, सारी कायनात उनके साथ है’. शिवसेनेला आता धडे मिळायला सुरुवात झालीय. भाजपनं स्वत:च्या कर्तुत्वावर हा निकाल मिळवलाय. भाजप काही महाविकास आघाडी नाही रडीचा डाव खेळायला. आत्ता जो आपला राजा आहे तो प्रजेसाठी किती योग्य आहे, हे मी विचारत होते. त्यावेळी कुणी बोललं नाही. पण आता राजा कसा आहे ते सगळ्यांना कळलं आहे. त्यामुळे मला काही बोलायची गरज नाही, असा खोचक टोला अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला होता.

Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.