Rajya Sabha Election Results : राऊत भडकले अन् अडकले! 6 आमदारांची नावं राऊतांनी घेतली, गुप्त मतदान कसं कळलं? सोमय्यांचा सवाल, निवडणूक आयोग कारवाई करणार?

शिवसेना नेते संजय राऊत त्यांच्याच विधानामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Rajya Sabha Election Results : राऊत भडकले अन् अडकले! 6 आमदारांची नावं राऊतांनी घेतली, गुप्त मतदान कसं कळलं? सोमय्यांचा सवाल, निवडणूक आयोग कारवाई करणार?
शिवसेना नेते संजय राऊत, भाजप नेते किरीट सोमय्याImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 2:26 PM

मुंबई :  शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) त्यांच्याच एका आरोपामुळे अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. राज्यसभा निवणुकीचा निकाल (Rajya Sabha Election Results) लागल्यानंतर संजय राऊतांनी अपक्षांवर गंभीर आरोप केला होता. आमच्या मित्र पक्षांनी आमच्यासोबत राज्यसभेच्या निवडणुकीत दगाबाजी केली, असं म्हणत त्यावेळी त्यांनी काही अपक्ष आमदारांचीही नावं घेतली होती, याच मुद्द्यावर बोट ठेवून निवडणुकीच्या आचारसंहितेचा राऊतांनी भंग केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी केलाय. संजय राऊत यांनी कशाच्या आधारावर ही आमदारांची नावं घेतली? त्यांना आमदारांच्या मतदानाबाबत कळलं कसं? असे सवालही किरीट सोमय्यांनी उपस्थित केले आहेत. तर निवडणूक आयोगानं यासंदर्भात चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी देखील सोमय्यांनी केलीय. यामुळे संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

राऊतांकडून आचारसंहितेचा भंग

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊतांनी काही आमदारांची नावं घोषित केली. त्यांनी ही नावं कशाच्या आधारावर घेतली? मतदान कुणी केलं, हे फक्त आयोगाला कळतं. संजय राऊतांना कसं कळालं? असा सवालही सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला. संजय राऊत यांनी निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत काय म्हणाले होते?

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर राऊत संतापून म्हणाले होते की, ‘राज्यसभा निवडणुकीत आमची वाट निसरडी होती. ज्या लोकांनी आम्हाला शब्द दिला तो शब्द पाळला गेला असता तर शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला नसता. वसई-विरारच्या हितेंद्र ठाकूर यांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे संजयमामा शिंदे, नांदेडचे श्यामसुंदर शिंदे आणि देवेंद्र भुयार या आमदारांची मतं आम्हाला मिळाली नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केलाय. काही घोड्यांवर जास्त बोली लागली. त्यामुळे बाजारात असलेले घोडे विकले गेले. घोड्यांना हरभरे टाकले की ते कुठेही जातात, अशी टीकाही संजय राऊत यांनी नाव घेतलेल्या अपक्ष आमदारांवर केली होती.

शिवसेना नेते संजय राऊत अडचणीत?

शिवसेना नेते संजय राऊत त्यांच्याच विधानामुळे अडकण्याची शक्यता आहे. आधीच भाजप आणि शिवसेनेमधील द्वंद सर्वश्रृत आहे. यात दोन्ही पक्षातील नेतेमंडळी एकमेकांच्या चुकांवर लक्ष ठेवून असतात. आता संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत आमदारांचे नावं घेऊन निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. यामुळे संजय राऊत अडचणीत सापडण्याची शक्यताय.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.