Amar Singh Death | राज्यसभा खासदार अमर सिंह यांची झुंज अपयशी, सिंगापूरमधील रुग्णालयात निधन
समाजवादी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे आज (1 ऑगस्ट) निधन (Rajya Sabha MP Amar Singh has passed away) झाले.
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे आज (1 ऑगस्ट) निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या दीर्घ आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर सिंगापूरमधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्तक्रिया करण्यात आली होती. मात्र आज त्यांचे निधन झाले. अमर सिंह यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली वाहत हळहळ व्यक्त केली. (Rajya Sabha MP Amar Singh has passed away)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमर सिंह यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत एक ट्विट केले. “अमर सिंह हे एक ऊर्जावान नेते होते. गेल्या कित्येक वर्षांपासून देशातील राजकारणातील अनेक चढ-उतार त्यांनी फार जवळून पाहिले. ते त्यांच्या जीवनात मैत्रीसाठी ओळखले जातं. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मी फार दु:खी झालो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Amar Singh Ji was an energetic public figure. In the last few decades, he witnessed some of the major political developments from close quarters. He was known for his friendships across many spheres of life. Saddened by his demise. Condolences to his friends & family. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2020
अमर सिंह हे समाजवादी पक्षाचे नेते होते. उत्तर प्रदेशात समाजवादीला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यात सिंह यांचा मोठा वाटा होता. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांच्यासोबत त्यांची चांगली मैत्री होती. समाजवादी आणि काँग्रेस पक्षाला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून अमर सिंह यांना मानले जाते.
तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. समाजवादी पक्षाला UPA सोबत जोडून ठेवण्याचा मुख्य काम अमर सिंह करत होते. भारतीय जनता पक्षाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पाडण्यात अमर सिंह यांनी मोठी भूमिका बजावली होती. सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून अमर सिंह यांनी भाजपसह त्यांच्या मित्रपक्षाचे अनेक खासदार आपल्या बाजूने केले होते.
कोण होते अमरसिंह?
- समाजवादी पार्टीचे सध्याचे राज्यसभेचे खासदार
- यूपीएच्या काळात अमरसिंहांचा दिल्लीत दबदबा
- मुलायमसिंह यांच्या जवळचे पण अखिलेशसोबत फार जमलं नाही.
- बॉलिवूडमध्येही दबदबा, अमिताभ बच्चन यांचे खास दोस्त
- सहारा ग्रुपसह अंबानी आणि इतर उद्योगपतींशीही संबंध
- जवळपास सर्वच पक्षात अमरसिंहांची खास दोस्ती
- डाव्यांनी पाठिंबा काढला त्यावेळेस अमरसिंहांनी यूपीएला वाचवलं
- राडिया टेप्सच्या वादात सापडले, क्लिंटन फाऊंडेशनला पैसे देण्यावरही वाद (Rajya Sabha MP Amar Singh has passed away)
संबंधित बातम्या :
अंथरुणाला खिळलेल्या अमर सिंहांची मृत्यूशी झुंज, अमिताभ बच्चन यांची जाहीर माफी!
स्टिअरिंगवरील हात निसटला तर गाडी झाडावर आदळणार, दानवेंचा टोला