Rajyasabha Eelction : कुठे दगाफटका झाला? संजय राऊतांनी केली शरद पवारांशी चर्चा , आता विधानपरिषदेसाठी सावध
आज शिवसेनेच्या गोटतील हटचाली वाढल्या आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली आहे. त्यानंतर अनेक राजकीय चर्चांणा उधाण आले आहे.
मुंबई : मध्य रात्री लागलेल्या राज्यसभेच्या (Rajyasabha Eelction)निकालात शिवसेनेला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर फडणवीसांचे चमत्कार यशस्वी ठरल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनीही मान्य केलं. तर ये तो झाकी है विधान परिषद बाकी है अशा घोषणा देताना भाजप नेते दिसून आले. त्यानंतर आज शिवसेनेच्या गोटतील हटचाली वाढल्या आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली आहे. त्यानंतर अनेक राजकीय चर्चांणा उधाण आले आहे. जेव्हापासून राज्यसभेची निवडणूक लागली होती तेव्हापासून सहावी जागा आमचीच म्हणून संजय राऊत छातीठोकपणे सांगत होते, मात्र ऐन टाईमिंगला फडणवीसांनी केलेली खेळी ही शिवसेनेला चांगलाच दणाक देऊन गेली आहे. त्यामुळेचा विधान परिषदेचा संभाव्य धोका ओळखून आता या भेटीगाठी सुरू आहेत.
भेटीनंतर संजय राऊत काय म्हणाले?
या भेटीबाबत संजय राऊतांना विचारले असता संजय राऊत म्हणाले, मी निवडून आलेलो आहे. राज्यसभेच्या निकालासंदर्भात आमची चर्चा झाली. सहाव्या जागेबाबतही चर्चा झाली. पण जिंकून आल्यावर वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्याचे असतात म्हणून मी आलेलो. विधान परिषदेबाबतही आमची चर्चा झाली. कालच्या निवडणुकीत आम्ही जिंकू का शकलो नाही? कुठे दगाफटका झाला यावरही आमचं बोलणं झालं. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर आक्रमक भाजपला उत्तर देताना ते म्हणाले एवढा आक्रमकपणा त्यांच्या तब्येतील झेपणारा नाही. त्याला उत्तर द्यायला शिवसेना खंबीर आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पवारांनी नियोजीत कार्यक्रम रद्द करून भेट घेतली
शरद पवार आणि संजय राऊत यांची ही भेट काही पूर्व नियोजित भेट नव्हती. शरद पवारांनी आपला पुरंदरमधील नियोजित कार्यक्रम रद्द करून ही भेट घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात सध्या अस्वस्थता आणि अस्थिरता आहे का? असे अनेक सावल राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहेत. तसेच आत्मविश्वास वाढलेल्या भाजपने आता विधान परिषदेच्याही सहाच्या सहा जागा निवडून आण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे आता बलाड्या भाजपला महाविकास आघाडी आता कशी थोपवणार? हेही त्यांच्यसमोरचं मोठं आव्हान असणार आहेत. तसेच गेल्या काही निवडणुकीत फडणवीसांची रणनिती ही महविकास आघाडीला मात देत आहे. त्यामुळे राजकारणातील धुर्त नेते समजल्या जाणाऱ्या पवारांकडे फडणवीसांना रोखण्यासाठी आता कोणता पर्याय उरलाय? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.