Rajyasabha Eleciton : आमची 6 उमेदवारांना 6 मतं, संजय राऊतांना कसं कळलं? हितेंद्र ठाकूर यांचा सवाल
आमदारांची नावं घेणाऱ्या संजय राऊतानाही कोही खोचक सवाल केले आहेत. आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत सहा उमेदवारांना सहा मतं दिली. ते सर्व निवडून आले, असे ठाकूर म्हणाले आहेत.
मुंबई : अर्ध्या रात्री लागलेला राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल (Rajyasabha Eleciton)हा शिवसेनेसाठी जणू काळरात्रच होता. कारण कितीही जोर लावला तरी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar)यांना दारून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवात आघाडीचे सुरूवातीचे मित्रपत्र आणि अपक्षांची भूमिका ही मैलाच्या दगडासारखी ठरली आहे. सरकार स्थापन करताना महाविकास आघाडीसोबत असणारे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी नेमकं या निवडणुकीआधी सावध भूमिका घेत शेवटपर्यंत पाठिंबा कुणाला हे सांगितलं नाही. मात्र निवडणूक पार पडल्यावर हितेंद्र ठाकूर यांनी यावरून तुफान बॅटिंग केली आहे. तसेच आमदारांची नावं घेणाऱ्या संजय राऊतानाही कोही खोचक सवाल केले आहेत. आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत सहा उमेदवारांना सहा मतं दिली. ते सर्व निवडून आले, असे ठाकूर म्हणाले आहेत.
नेमकी कुणाला मतं दिली?
या निवडणुकीबाबत बोलताना ठाकूर म्हणाले, मी योग्य माणसाला मतं दिली आहेत प्रफुल पटेल, इम्रान प्रतापगडी, संजय राऊत, पियुष गोयल, बोंडे, धनंजय महाडिक यांना आम्ही 6 मत दिली ते निवडून आले. तसेच आमचे गुप्त मतदान होते, हे संजय राऊत साहेबांना कसे कळाले? असा सवालही त्यांनी केला आहे. तर आता शिवसेनेकडे 54 मतदान होते त्यांना 74 मतं मिळाली. मग ती 20 मतं कुणाची हेही राऊत साहेबांनी सांगावे, असा टोलाही त्यांनी लगाला आहे.
आमदार बाजार म्हणा…
हरबरा, मका, चणे याचा सिजन नाही, पण मी माझ्या 30 वर्षाच्या काळात कधीच कुण्या चण्याच्या मागे गेलो नाही आणि जाणार नाही. हे सर्वच पक्षांना माहीत आहे, तसेच आमदारांना घोडेबाजार म्हणू नये, आणि बोलायचे तर घोडेबाजार काय आमदार बाजार म्हणाना ना? पण आमदार हा 3 साडेतीन लाख लोकांचं प्रतिनित्व करतो, त्यांना असं बोलू नका, असेही ते म्हणाले आहेत.
प्रशासक आणून आमचा पराभव होणार आहे का?
तर मी ed, बिडी, टाडाला घाबरत नाही, हे सर्व बघून बसलोय. आम्ही प्रेमाने काम करतो, घाबरून नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. तसेच मागच्या अडीच वर्षात मार्जितला प्रशासक आणून गाजावाजा केला की आम्ही काम केले आणि हितेंद्र ठाकूर यांनी काहीच नाही केले, पण बॉडी नव्हती, पण प्रशासका आडून आमचा पराभव होणार का? आणि तो कोणी करू शकत नाही, असेही त्यांनी सेनेला बजावले आहे. तर त्यांच्याच पक्षातील लोक नाराज आहेत. मागची 8 दिवस त्यांचीच धुमश्चक्री चालू होती, असा टोला त्यांनी सेनेला लगावला आहे.