Rajyasabha Election : मविआचे सर्व आमदार हॉटेलात राहणार, मतदानाची रंगीत तालीम, सुत्रांची माहिती, मित्रपक्षांमुळे धाकधुक वाढली?

महाविकास आघाडीला सरकार स्थापनेवेळी समर्थन देणारे छोटे पक्ष आता दुरावताना दिसत आहे. आमची भूमिका ही मतदानादिवशीच ठरवू अशी भूमिका बहुजन विकास आघाडीने घेतलीय. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत थेट नाराजी व्यक्त केलीय.

Rajyasabha Election : मविआचे सर्व आमदार हॉटेलात राहणार, मतदानाची रंगीत तालीम, सुत्रांची माहिती, मित्रपक्षांमुळे धाकधुक वाढली?
मविआचे सर्व आमदार हॉटेलात राहणार, मतदानाची रंगीत तालीम, सुत्रांची माहिती, मित्रपक्षांमुळे धाकधुक वाढली?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 5:35 PM

मुंबई : राज्यसभेच्या मतदानाच्या (Rajyasabha Election) काही दिवस आधीच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मित्र पक्षांनी सावध भूमिका घेतल्याने महाविकास आघाडlतीलल धाकधूक आता वाढली आहे का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. कारण महाविकास आघाडीने सर्व आमदारांना (Mahavikas Aghadi MLA) आता हॉटेलात ठेवण्याचा निर्णय घेतला आहेत. तसेच त्यांना मतदानादिवशी काय खबरदारी घ्यावी याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. राज्यसभेसाठी सध्या सहा जागेसाठी सात उमेदावर मैदानात असल्याने ही निवडणूक जास्त चुरशीची झाली आहे. तसेच मतदानाच्या काही दिवस आधीच महाविकास आघाडीला सरकार स्थापनेवेळी समर्थन देणारे छोटे पक्ष आता दुरावताना दिसत आहे. आमची भूमिका ही मतदानादिवशीच ठरवू अशी भूमिका बहुजन विकास आघाडीने घेतलीय. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत थेट नाराजी व्यक्त केलीय.

दोन पक्ष आधीच नाराज

महाविकास आघाडीला सरकार स्थापनेवेळी समर्थन देणाऱ्या दोन पक्षांनी आधीच उघड नाराजी व्यक्त केली आहे. मी यांना सरकार स्थापनेला पाठिंबा दिला, आता हे मला वसई-विरार महापालिका सोडणार आहेत का? असा सावल बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी करत, सावध भूमिका घेतली आहे. तर आपल्या विभागातील कामं झाली नाहीत, माझ्या पत्रांना तुम्ही उत्तरं देत नाही, आणि हिंदुत्वाबाबत तुमची भूमिका साशंक आहे म्हणत, सपानेही मतदान करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यसभेसाठी मैदानात असलेले उमेदवार

  1. पियुष गोयल, भाजप
  2. अनिल बोंडे, भाजप
  3. धनंजय महाडिक, भाजप
  4. संजय राऊत, शिवेसेना
  5. संजय पवार, शिवसेना
  6. प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी
  7. इम्रान प्रतापगडी, काँग्रेस

सेनेचा रस्ता खडतर

मित्रपक्षांनी सावध भूमिका घेतल्याने आता शिवसेनेचा रस्ता हा खडतर होताना दिसत आहे. दुसरीकडे ही जागा आमचीच आहे. विरोधकांनी ही निवडणूक आमच्यावर लादली आहे. मात्र तरीही आम्हीच जिंकू असे शिवसेना खासदार संजय राऊत सांगत आहेत. तर भाजप नेतेही धनंजय मुंडेच्या विजयाचा दावा करत आहेत. आमची मतांची जुळवाजुळव झाली आहे. त्यामुळे आमचे तिन्ही उमेदावर निवडून येणार असे भाजप नेत्यांकडून आत्मविश्वासाने सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात बाजी कोण मारणार आणि ही सहावी जागा कुणाच्या गोटात जाणार हे निवडणुकीनंतरच कळेल. मात्र तुर्तास तरी या सातव्या उमेदवाराने राजकारणाचा माहौल मान्सूनपूर्व उकाड्यापेक्षाही जास्त तापवला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.